Breaking News

पारदर्शकता व विश्वास हे भाजपचे गणित -मंत्री रवींद्र चव्हाण

चौक जिल्हा परिषद विभागातील शिवसेना कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल

मोहोपाडा, खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील चौक येथे पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. येथील चौक विभागप्रमुखांसह बोरगाव, चौक ग्रामपंचायत सरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 31) भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी पारदर्शकता आणि विश्वास हे भाजपचे गणित आहे. आपण ज्या विश्वासाने भाजपात प्रवेश केला आहे तो तुमचा विश्वास सार्थ ठरविल्याशिवाय गप्प बसणार नाही. या भागातील आदिवासी बांधवांच्या अडचणी दूर करण्यासाठी मंत्री महोदयांच्या दालनात लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले.
खालापूर तालुक्यातील चौक जिल्हा परिषद विभागातील शिवसेनेचे (ठाकरे गट) प्रमुख सुधीर ठोंबरे यांच्यासह बोरगाव ग्रामपंचायतीचे आजी-माजी सरपंच प्रविण मोरे व प्रितेश मोरे, चौक ग्रामपंचायतीच्या सरपंच रितू ठोंबरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी उरणचे आमदार महेश बादली यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते.
या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी आमदार देवेंद्र साटम, विनोद साबळे, तालुका अध्यक्ष भाजप रामदास ठोंबरे, कर्जत तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, अविनाश कोळी, दिपक बेहरे, किरण ठाकरे, तुपगाव सरपंच कुंभार, लक्ष्मण पवार, रमेश मुंढे यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खालापूर तालुक्यातील भाजपचा हा पहिलाच भव्यदिव्य कार्यक्रम असल्याचे पहायला मिळाला. जवळपास पाच हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

आज चौक विभागातून भाजपत प्रवेश करणार्‍या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून एक विश्वास देतो की, आपले विकासाचे स्वप्न लवकरच पूर्णत्वास जाईल. येथील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून प्रयत्न करेन.
-आमदार प्रशांत ठाकूर, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष

भाजपात प्रवेश करतांना तुम्ही नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, मंत्री रविंद्र चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे, तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी या विभागाचा आमदार म्हणून प्रामाणिकपणे काम करण्यास सुरुवात केली आहे.
-आमदार महेश बालदी, उरण विधानसभा

उरण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला विकास येथील जनतेला प्रगतीचा नवा मार्ग दाखवित आहे. आज शिवसेनेचे चौक जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख सुधीर ठोंबरे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केल्याने भविष्यात या विभागातच नव्हे तर संपूर्ण खालापूर तालुक्यात भाजपाला नवी उभारी मिळणार आहे.
-रामदास ठोंबरे, भाजप तालुकाध्यक्ष, खालापूर

येथील आदिवासी बांधवांचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत. आदिवासी बांधवांच्या घरांचा प्रश्न, काटवन आदिवासी वाडीच्या रस्त्याचा प्रश्न, विकासाची प्रलंबित कामे आता पूर्ण होतील, अशी मला विश्वास आहे.
-प्रविण मोरे, भाजप पक्ष प्रवेशकर्ते

चौक ग्रामस्थांनी मला थेट सरपंच म्हणून अठराशे मतांनी निवडून दिले. त्या सर्व मतदारांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मला केंद्रातील व राज्यातील भाजपच्या सरकारचे सहकार्य महत्त्वाचे असल्याने मी आज भाजपत प्रवेश करीत आहे. माझे एकमेव ध्येय चौक ग्राम पंचायतीचा विकास होय.
-रितू ठोंबरे, सरपंच, ग्रामपंचायत चौक

दूरदृष्टी ठेवून भाजपत प्रवेश करणारे कार्यकर्ते उद्याच्या विकासाचे खरे साक्षीदार ठरणारे आहेत. भाजप हा दूरदृष्टीच्या विकासाचा पक्ष असल्याने या पक्षासोबत आपणही जोडले जावे अशी अपेक्षा असणारे अनेक कार्यकर्ते लवकरच भाजपत सामिल झाल्याशिवाय राहणार नाहीत. स्वार्थी, सुडबुध्दीचे राजकारण करणार्‍या शिवसेना पक्षप्रमुखांच्या राजकारणामुळे पक्ष लयास जायला निघाला आहे.
-देवेंद्र साटम, माजी आमदार

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply