शिवजयंतीनिमित्त भाजपची शिवगान स्पर्धा

‘सीकेटी’त रायगड जिल्ह्याची प्राथमिक फेरी

कर्जत ः बातमीदार

भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठ सेलच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा अंतिम सोहळा किल्ले अजिंक्यतारा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी 19 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याची प्राथमिक फेरी पनवेल खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्याची माहिती भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठचे संयोजक अभिनेते राहुल वैद्य यांनी दिली. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप सांस्कृतिक सेलचे जिल्हा अध्यक्ष बल्लाळ जोशी यांनी केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आढावा घेणारी गाणी, पोवाडे, ललकारी, पाळणा गीते, स्फूर्तिगीते, आरती, अभंगांचे सादरीकरण या वेळी स्पर्धकांना करता येणार आहे. सांघिक आणि वैयक्तिक स्तरावर होणार्‍या या स्पर्धेसाठी स्वयंरचित गाण्यांना विशेष प्राधान्य असेल. प्रत्येक जिल्हा स्तरावर ही स्पर्धा होणार आहे. अंतिम स्पर्धा राज्य स्तरावर सातारा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या किल्ले अजिंक्यतारा येथे होणार आहे. 19 फेब्रुवारी रोजी राज्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत असताना भाजप प्रदेश सांस्कृतिक सेलच्या माध्यमातून आयोजित होणार्‍या शिवगान स्पर्धेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Check Also

Połączenie 30 darmowych spinów Mostbet z innymi bonusami

Połączenie 30 darmowych spinów Mostbet z innymi bonusami W dzisiejszym artykule skupimy się na tym, …

Leave a Reply