अलिबाग : रामप्रहर वृत्त
दाखलपूर्व आणि प्रलबिंत खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने रायगड जिल्ह्यात शनिवारी आयोजित केलेल्या लोकन्यायालयात वादपूर्व व दाखल अशी एकूण 37 हजार 763 प्रकरणे सामंजस्याने मिटवण्यात यश आली, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल शिंदे यांनी दिली.
रायगड जिल्ह्याच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रामगड जिल्ह्यातील वादपूर्व प्रकरणे व प्रलंबित अशी एकूण 98 हजार 623 प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी वादपूर्व प्रकरणे 36 हजार 225 व प्रलंबित प्रकरणांपैकी एक हजार 538 प्रकरणे अशी एकूण 37 हजार 763 प्रकरणे सामंजस्याने मिटवून लोक अदालतीमध्ये निकाली निघाली व त्याव्दारे पक्षकारांना एकूण 13 कोटी 29 लाख 08 हजार 526रुपयाची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील विविध न्यायालयांत 28 लोकअदालतीचे कथा स्थापन करण्यात आले होते. लोकअदालतीमध्ये पक्षकारांना न्यायालयात येण्याची सक्ती न करता व्हिडीओ कॉलचा वापर करूनसुद्धा प्रकरणे मिटविण्यात आली.
23 जोडप्यांचा संसार जुळला
रायगड जिल्ह्यातील लोकन्यायालयात 23 जोडप्यांचा (अलिबाग येथील लोकन्यायालयात सात, कर्जत एक, माणगाव दोन, पाली एक, रोहा पाच, महाड सहा, पनवेल एक) सामंजस्याने वाद मिटल्यामुळे नादांयला गेली. अलिबाग येथील पक्षाकरांचा प्रमुख जिल्हा न्यायाधिश एस. एस. सावंत व पॅनलवरील न्यायधिशांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
Check Also
केंद्रीय मंत्री रामदास आठवले रविवारी कामोठ्यात
महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ सभा कामोठे : रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी …