कर्जत : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील तळवडे येथील जय गणेश क्रिकेट संघाने आणि शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख मिलिंद विरले यांनी पुढाकार घेऊन आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. चार दिवस रंगलेली ही स्पर्धा जय भवानी धुळेवडी या संघाने स्थानिक तळवडे बुद्रुक येथील महालक्ष्मी इलेव्हन संघाचा पराभव करून जिंकली व आमदार चषक पटकाविला.
उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या भाकरीपाडा येथील मैदानावर ही स्पर्धा कर्जत तालुक्यातील 32 संघांमध्ये खेळविली गेली. कर्जत तालुका क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने खेळविण्यात आलेली या क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामना तळवडे बुद्रुक आणि धुळेवाडी या दोन संघांमध्ये झाला. त्यात धुळेवाडी संघाने बाजी मारली. तिसरा क्रमांक साई एलेव्हन आंबिवली संघाने, तर चौथा चिंतामणी वाकस संघाने मिळविला. विजेत्या संघांना पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेत मालिकावीर म्हणून संकेत माळी, उत्कृष्ट फलंदाज तानाजी धुळे, उत्कृष्ट गोलंदाज विकी घोडविंदे, विकेट हॅट्ट्रिक करण भुंडरे, चौकार हॅट्ट्रिकसाठी तनाजी धुळे यांना गौरविण्यात आले.
पारितोषिक वितरण समारंभास माजी उपसभापती मनोहर थोरवे, शिवसेना शाखाप्रमुख सुनील विरले, कुमार शेळके, उपशाखाप्रमुख कुंदन विरले, विनायक शेळके, मयूर दळवी, संदीप मसणे, राजेश विरले, नवनाथ विरले, भगवान राणे,
भानूदास विरले, मारूती डायरे, साहील डायरे, अमर बाबरे, निवृत्ती खाडे, हरेश विरले, भूषण विरले, आदिनाथ विरले आदी उपस्थित होते.
Check Also
बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट
चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …
RamPrahar – The Panvel Daily Paper