चित्रपट पाहता पाहता तो ऐकण्यातही भारतीय चित्रपट रसिकांना कायमच रस. 1975च्या उत्तरार्धातील ही गोष्ट ऐका,
अनेक ठिकाणी एखाद्या सणासुदीला अथवा काहीही कारण नसतानाही लाऊडस्पीकर लागलाय वा मोठ्याच आवाजात टेपरेकॉर्डर लावलाय,
इसलीये के लोहा लोहे को काटता है…
यहा से पचास पचास कोस दूर गाव में जब बच्चा रोता है तो मा कहती हैं बेटे सोजा… सोजा नहीं तो गब्बरसिंग आ जाएगा…
देखो छमिया, जादा नखरे मत करो, नही तो ये गोरी चमडी है नं सारे बदन से खुरज खुरज कर उतार दूंगा, समझी?
बहुत याराना लगता है…
जस जसे डायलॉग पुढे जातात तस तशी ते ऐकायला गर्दी वाढत वाढत जाते. सगळे आजूबाजूचे वातावरण विसरून हा प्रत्येक डायलॉग मनापासून ऐकतोय. बरं हे कालपरवाही त्याने ऐकलंय आणि उद्या परवा आणि त्यानंतरही ते हे धारदार संवाद ऐकणार आहेत…
एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच की रमेश सिप्पी दिग्दर्शित शोले (1975)चे हे जबरा डायलॉग आहेत. या चित्रपटाच्या खणखणीत यशात अनेक लहान मोठ्या गोष्टींसह सलिम जावेद यांचे धारदार संवाद, ते सादर करण्यातील प्रत्येक व्यक्तीरेखेतील कलाकाराची पद्धत आणि खासकरून मिनर्व्हा थिएटरमधील सत्तर एमएमचा भव्य पडदा आणि स्टिरिओफोनिक साऊंडचा यांचा वाटा होता. लाऊडस्पीकर अथवा कॅसेटवर एकेक डायलॉग ऐकताना गब्बरसिंग वगैरे डोळ्यासमोर येत… पिक्चर असाही दिसतो, असाही आपल्यापर्यंत पोहचतो.
पिक्चर पब्लिकला आवडला आणि मग त्याचे डायलॉग असे काही सुपर हिट ठरले की त्याची तबकडी प्रकाशित करण्यात आली आणि त्याचीही विक्रमी विक्री झाली. पिक्चर सुपर हिट झाले की त्याला कोणीच थांबवू शकत नाहीत ते हे असे.
हिंदी चित्रपटातील डायलॉग गाजण्याची परंपरा तशी खूपच मोठी, पण कालांतराने दक्षिण भारतीय प्रादेशिक भाषेतील चित्रपट हिंदीत डब होऊन पडद्यावर आले तेव्हाही ते गाजू लागले…
’पुष्पा’चा झुकेगा नहीं साला… राजकारणापासून इव्हेन्टसपर्यंत आणि जाहिरातीपासून रिअॅलिटी शोपर्यंत सगळीकडे गाजला.
चित्रपट हे दृश्य माध्यम असले, ’कॅमेरा’ आपल्याला चित्रपट दाखवत असला तरी आपल्या देशात ते प्रामुख्याने संवाद माध्यम म्हणून जणू विकसित होत गेले. चित्रपट पाहताना ते जास्त ऐकला जातो असे म्हणता येईल.
नाटक माध्यमातून चित्रपट माध्यमात असा प्रवास असल्याने सुरुवातीच्या काळातील अनेक चित्रपट जणू नाटक चित्रीत केले आहे असे वाटतात आणि त्या काळात संवादही लांबलचक असत. याचे कारण म्हणजे प्रत्येक व्यक्तिरेखा बोलेल त्याप्रमाणे ’चित्रपटाची गोष्ट’ प्रेक्षकांना समजेल अशी भावना होती आणि ती त्या काळाशी सुसंगत होती.
पूर्वी म्हणूनच अनेक कलाकारांचे संवाद रसिकांना आवडत, ते पाठ केले जात, ते ऐकण्यासाठी पुन्हा एकदा सिनेमा थिएटरची वारी केली जाई. राज कपूर, दिलीप कुमार आणि देव आनंद यांच्या दिसण्या बोलण्यावर त्यांचे चाहते फिदा होते. सोहराब मोदी यांचे केवळ संवाद ऐकण्यासाठी अगदी दृष्टीहीन प्रेक्षकही ’पुकार’ चित्रपट पाह्यला जात याची पूर्वी नेहमीच चर्चा व्हायची. याबाबत कथा दंतकथा प्रचलित आहेत.
के. असिफ दिग्दर्शित ’मुगल ए आझम’ (1960)मधील संवादानाही रसिकांची अतिशय उत्तम दाद मिळाली.
एका प्रसंगात अकबर (पृथ्वीराज कपूर) सलिम (दिलीप कुमार) याला उद्देशून म्हणतो, हम एक लाडले बेटे के बाप जरुर है, लेकिन अपने बेटे के धडकते दिल के लिए, हम हिंदुस्तान की तकदीर नहीं बदल सकते.
यावर सलिमही तितक्याच परखडपणे आपल्या पिताजींना सुनावतो, तकदीरे बदल जाती है। जमाना बदल जाता है, मुल्लो की तारीख, इतिहास बदल जाता है, शहेनशहा बदल जाते हैं, मगर बदलती दुनिया में मुहब्बत जिसका दामन थाम लेती है वो इन्सान नहीं बदलता… थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट व्हायचा.
यश चोप्रा दिग्दर्शित ’वक्त’ (1965)मधील राजकुमारची व्यक्तिरेखा जोरदार संवादाने ’कडक’ ठरली. चिनॉय सेठ, यह बच्चो के खेलने की चीज नहीं, हात कट जाए तो खून निकल आयेगा… हा संवाद गाजला.
या जबरदस्त प्रतिसादामुळे काय झालं तर राजकुमार आपली व्यक्तिरेखा विसरून फक्त आणि फक्त डायलॉगबाजीवर लक्ष देऊ लागला आणि त्याला मग वाटू लागले की, प्रेक्षक चित्रपट पहायला नव्हे तर आपल्याला पडद्यावर पहायला तिकीट काढतात… कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ’बुलंदी ’ या चित्रपटातील त्याचा ’इरादा पैदा करो इरादा. इरादे से आसमान का चांद भी इन्सान की कदमो मे सजदा करता है’ हा जोरदार संवाद इम्पिरियल थिएटरच्या भिंतीवर लिहिला होते आणि तो वाचून तिकीट काढले जाई.
त्या काळात अशा संवाद लेखनावर विशेष लक्ष दिले जाई, याचे कारण म्हणजे पब्लिक कलाकाराच्या भावमुद्रेपेक्षा (एक्प्रेशन) त्याच्या बोलण्यावर जास्त लक्ष केंद्रित करीत. त्यांना तेच जास्त आवडे. विशेष म्हणजे फार पूर्वी आपल्याकडे थिएटरची साऊंड सिस्टीम म्हणावी तशी प्रगत नव्हती, तरीही हे डायलॉग पब्लिक समरसून ऐकायचा आणि अनेक जण तर आवडत्या डायलॉगसाठी पुन्हा एकदा थिएटरची वारी करीत.
राज कपूर दिग्दर्शित ‘बॉबी’ (1973)मधील प्रेम नाम है मेरा… प्रेम चोप्रा हा डायलॉग असा काही गाजला की प्रेम चोप्राने आपल्या आत्मचरित्राचे तेच नाव ठेवले आणि त्या नावाने मराठी रंगभूमीवर नाटकही आले.
मेहुलकुमार दिग्दर्शित ‘क्रांतिवीर’चेही डायलॉग असेच प्रचंड टाळ्या व शिट्ट्यांनी डोक्यावर घेतले.
ये मुसलमान का खून, ये हिंदू का खून….बता इसमें मुसलमान का कौनसा, हिंदू का कौनसा… बता…,
आ गये मेरे मौत का तमाशा देखने…
उपरवाला भी उपर से देखता होगा तो उसे शर्म आती होगी… सोचता होगा मै ने सबसे खुबसूरत चीज बनाई थी इन्सान…. नीचे देखा तो सब कीडे बन गये है… कीडे
हम भले ही उपरवाले को अलग अलग नाम से पुकारते है… लेकिन हमारा धरम एक है, मजहब एक है… इन्सानियत!
कुत्ते… कुत्ते की तरह जीने की आदत पड गयी है सबको…
तुमसे तो वो वेश्या अच्छी होती है, जो बेचती जरुर है, मगर अपना जिस्म बेचती है… अपने देश की आत्मा को, अपने ईमान को नहीं बेचती
‘क्रांतिवीर’ चक्क एकतीस वर्ष पूर्ण झालीदेखील, तरी या जोरदार शोरधार संवादाचा आवाज कानात घुमतोय. अधूनमधून सोशल मीडियात त्याचे भाग व्हायरल होताहेत.
‘क्रांतिवीर’ वेगळ्याच सामाजिक वातावरण निर्माण झाला. 6 डिसेंबर 1992 रोजीचे उत्तर प्रदेशातील अयोध्येतील बाबरी मशीदी प्रकरण, त्याची देशातील विविध भागात उमटलेली प्रतिक्रिया, हिंदू व मुसलमान यांच्यातील संघर्ष, जानेवारी 1993मध्ये मुंबईत झालेली जातीय दंगल, 12 मार्च 1993 रोजी मुंबईत झालेले 12 बॉम्बस्फोट या सगळ्यातून सामाजिक, सांस्कृतिक, माध्यम वातावरणात तणाव निर्माण झाला होता आणि त्याची विविध माध्यमातून प्रतिक्रियाही उमटत होती. त्याचाच एक भाग म्हणून मणिरत्नम दिग्दर्शित ‘बॉम्बे’. नाना पाटेकरमध्येही एक आजूबाजूच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय गोष्टींवर जळजळीत भाष्य करणारा जागरूक माणूस. ‘क्रांतिवीर’मधील प्रताप नारायण टिळक हा त्याला मोठाच प्लॅटफॉर्म मिळाला. त्याने जणू अख्खा पिक्चर ताब्यात घेतला आणि तो सुसाट वेगात बोलत सुटला…
याच चित्रपटात डॅनी डेन्झोपाचा एक डायलॉग आहे, हम तुम्हे ऐसे जलाऐंगे की तेरे चाहनेवालो को गंगा मे नहाने के लिए तेरी राख भी नसीब नही होगी…
हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ’आनंद’ (1971)मधील संपूर्ण चित्रपटभरची राजेश खन्नाची अखंड प्रचंड बकबक म्हणजे मुक्त डायलॉगबाजी आहे आणि त्यात जास्त गाजला,
बाबू मोशाय, जिंदगी और मौत उपरवाले के हात मै है जहा पनाह, उसे ना आप बदल सकते हैं ना मे, हम सब तो रंगमंच की कठपुतलीया है जिनकी डोर उपरवाले की उंगलियो में बंधी है, कौन कब कैसे उठेगा यह कोई नहीं बता सकता… हा भावपूर्ण संवाद ’आनंद’ चित्रपटाचे सार आहे, ओळख आहे आणि राजेश खन्नाने तो आपल्यातील अभिनय गुणाचा प्रत्यय देत तो पडदाभर साकारला. राजेश खन्नाच्या निधनाचे वृत्त देताना प्रसार माध्यमात हा संवाद आवर्जून दिला गेला. हा संवाद एक प्रकारची राजेश खन्नाची जणू ओळख झाली होती. मै मरने से पहले मरना नहीं चाहता, जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नहीं असे ’आनंद’मधले राजेश खन्नामय झालेले अनेक लहान मोठे संवाद गाजले.
प्रकाश मेहरा दिग्दर्शित ’जंजीर’(1973)मधील अमिताभ बच्चनने प्राणला उद्देशून म्हटले, यह पुलीस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नहीं… या संवादाने अमिताभला स्टार केले.
यश चोप्रा दिग्दर्शित ’दीवार’(1975)मधील विजय (अमिताभ बच्चन), त्याचा भाऊ रवि (शशी कपूर) आणि त्यांची आई (निरूपा रॉय) यांच्यातील ’डायलॉगबाजी’ अतिशय नाट्यमय अशी आहे. अगदी छोट्या छोट्या संवादाचा प्रभाव कायम होता.
मेरे पास मा है… हे इतक्या भावपूर्णरित्या व्यक्त होते की त्यातून संवादाची ताकद आणि महत्त्व लक्षात येते. ’दीवार’च्या डायलॉगची तबकडी प्रकाशित होणं स्वाभाविक होतेच.
जाओ पहले उस आदमी का साईन ले के आओ जिसने मेरे बाप को चोर कहा था, पहले उस आदमी का साईन ले के आओ जिसने मेरी मां को गाली दे के नौकरी से निकाल दिया था, पहले उस आदमी का साईन ले के आओ जिसने मेरे हाथ पर ये लिखा था… ये… उसके बाद मेरे भाई तुम जहाँ कहोंगे मै साईन कर दूंगा… ’दीवार’चा हा आणखी एक गाजलेला डायलॉग आणि ’दीवार’ने निर्माण केलेल्या वातावरणात ’शोले’ पडद्यावर आला आणि नवीन पर्व सुरू झाले.
यश चोप्रा दिग्दर्शित ’त्रिशूल’, मनमोहन देसाई दिग्दर्शित ’अमर अकबर अॅन्थनी’, टीनू आनंद दिग्दर्शित ’शहेनशहा’, रमेश सिप्पी दिग्दर्शित ’सागर’ अशा अनेक चित्रपटांचे संवाद गाजले.
आपल्या देशात चित्रपट ऐकायलाही प्रेक्षकांना आवडत असते. त्याचा कालांतराने फिल्मवाल्यांनाच विसर पडला. अधूनमधून ’सिंगम’ अथवा ’पुष्पा’मध्ये काही डायलॉग टाळ्या वसूल करत.
’केजीएफ 2’ने तीच सुपर डायलॉगबाजी प्रेक्षकांसमोर आणली आणि टाळ्यांचा प्रतिसाद मिळू लागला.
अपने को इतिहास पे भरोसा नहीं है…
होता है कुछ और है तो लिखवाते कुछ और है…
कही सुनी बातें मत लिखना…
खुद अपनी आँखो देखी लिखना…
उसमें एक वजन होता है…
मैं हमेशा जंग टालने की कोशिश करता हूं,
लेकिन जंग हुई तो जीतूंगा तो मैं ही…
कुछ लोग गुलाम बनके ही सही, सौ साल जीना चाहते हैं…
लेकिन कुछ लोग एक दिन जिए तो सुल्तान की तरह जीना चाहते हैं…
केजीएफ खून से लिखी हुई कहानी है, स्यायी से नहीं बढेंगी …
अगर आगे बढानी हैं तो फिरसे गोली मांगेगी.
…हिंदी चित्रपटात पुन्हा ’हुकमी डायलॉग’ ऐकू आलेच तर ते हवेच आहेत, पण ग्लोबल युगात हिंदी चित्रपटाची पटकथा इंग्रजीत लिहिली जात असल्याने हिंदी डायलॉग लिहिणे जास्त कष्टाचे काम.
राजकुमारचे काही गाजलेले संवाद
जब राजेश्वर दोस्ती निभाता है तो अफसाने लिक्खे जाते है और जब दुश्मनी करता है तो तारीख बदल जाती है (चित्रपट सौदागर)
न तलवार की धार से न गोलियों की बौछार से बंदा डरता है सिर्फ परवरदिगार से (चित्रपट तिरंगा)
हम अपने कदमों की आहट से हवा का रुख बदल देते है (चित्रपट बेताज बादशाह)
…असे खास राजकुमार शैलीचे डायलॉग ही त्याची ओळख झाली आणि राजकुमारसाठीच असे संवाद लिहिले जाऊ लागले तसेच राजकुमारची डायलॉगबाजी पिक्चर हाऊसफुल्ल करू लागली.
प्रभावी बोलणं हा अभिनयातील महत्वाचा भाग. ज्याला तो जमला अथवा साध्य झाला तो यशस्वी ठरला आणि त्यांचे काही संवाद गाजले. तर ज्यांना शब्दाची ताकद समजली अथवा पेलली नाही अथवा वाक्य काय ते समजलेच नाही ते निष्प्रभ ठरले. महत्वाचे म्हणजे, रसिकांना कोण कसे बोलतयं हे चांगले समजत असतेच. ते एखाद्या संवादाला उगाच टाळ्या, शिट्ट्या, हशा देत नाहीत.
हिंदी चित्रपटाच्या वाटचालीत संवाद लेखक खूप झाले. त्यात गुलजार, सलिम जावेद (सलिम खान आणि जावेद अख्तर), कादर खान यांच्या संवादांचा जनसामान्यांवर जास्त प्रभाव पडला. यांनी अनेक चित्रपट ऐकण्यासारखेही केले.
हिंदी चित्रपटातील काही गाजलेल्या डायलॉगची ही झलक
किसी बडी खुशी के इंतजार मे हम ये छोटी छोटी खुशियों के मौके खो देते है (बावर्ची या चित्रपटात राजेश खन्ना)
हम जहां खडे होते हैं लाईन वही से शुरू होती है (’कालिया’मध्ये अमिताभ बच्चन).
ये फुलो के साथ साथ दिल कब से बेचना शुरू कर दिया है ( ’कश्मीर की कली ’या चित्रपटात प्राण)
म्हटलं ना चित्रपट हे दृश्य माध्यम असले तरी आपल्या देशात ते प्रामुख्याने संवादाचे माध्यम म्हणून रूजले आणि अगणित विशेष संवादाना, विशिष्ट संवाद शैलीला उत्तम लोकप्रियता मिळाली. अगदी काळ बदलला तरी डायलॉगबाजीची किमया कायमच राहून लाईक्स मिळू लागल्या…. ‘शोले’ पन्नास वर्ष सेलिब्रेशन मुंबईत रिगल चित्रपटगृहात असो वा इटलीतील भव्य चित्रपटगृहात भारी प्रतिसाद त्याच्या डायलॉगना मिळाला… टाळ्या, शिट्याच सांगतात, कितने आदमी थे?
-दिलीप ठाकूर (चित्रपट समिक्षक)
Check Also
उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम
भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …
RamPrahar – The Panvel Daily Paper