मोहोपाडा : प्रतिनिधी
रसायनी पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील आपटा गावाच्या हद्दीत डोंगराळ व जंगल भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तीन गावठी बॉम्ब आढळले. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत रसायनी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात व्यक्तींनी शिकारीसाठी आपटा हद्दीतील पाठारे फार्महाऊसच्या पाठीमागील बाजूस एक किलोमीटर अंतरावर डोंगराळ व जंगल भागात तीन गावठी बॉम्ब बेकायदेशीररित्या पेरून ठेवले होते. त्यामुळे जंगली प्राणी व मानवी जीवितास धोका होण्याचा शक्यता होती.
याबाबत नागरिकांनी रसायनी पोलीस ठाण्यात कळवले असता निरीक्षक अश्वनाथ बप्पाजी खेडकर व त्यांच्या पथकाने आपटा येथे जाऊन गावठी बॉम्ब शोधून काढले व ते पडताळणीसाठी पाठविले आहेत.
दरम्यान, या प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात भा. दं. वि. कलम 286सह भारताचा स्फोटक पदार्थाचा अधिनियम 1908 चे कलम 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
Check Also
उलवे नोडमध्ये गुरुवारपासून ‘नमो चषक’
पनवेल : रामप्रहर वृत्तलोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व …