Breaking News

पनवेलमधील तोंडरेत शेकापला खिंडार

चार माजी सरपंच, उद्योगपती समर्थकांसह भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त
शेतकरी कामगार पक्षाला पनवेल तालुक्यातील तोंडरे गावात खिंडार पडले आहे. भाजपचे सक्षम नेतृत्व आणि विकासकामांवर प्रभावित होऊन शेकापचे माजी सरपंच नारायणशेठ चांगो पाटील, अशोक पदू पाटील, वासुदेव हाळुराम पाटील, तोयराम गोविंद पाटील आणि उद्योगपती सुरेशशेठ खानावकर यांनी त्यांच्या समर्थकांसह विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा पक्षप्रवेश सोहळा झाला.
या पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिन पाटील, उपाध्यक्ष तथा माजी सरपंच राम महादू पाटील, भाजप नेते एकनाथ देशेकर, खैरणेचे सरपंच शैलेश माळी, चिंध्रण सरपंच एकनाथ पाटील, भाजप नेते शिवाजी दुर्गे, माजी नगरसेवक संतोष भोईर, माजी सरपंच रामदास फडके, काळुराम फडके, कृष्णा पाटील, युवा मोर्चाचे दिनेश खानावकर, धनाजी पाटील, चंद्रकांत पाटील, अभिमन्यू पाटील, विनोद पाटील, नितेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशात आणि राज्यात भाजपच्या माध्यमातून विकास होत आहे. रायगड जिल्ह्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष अधिकाधिक मजबूत होत चालला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे तालुका उपाध्यक्ष तथा माजी सरपंच राम महादू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकापचे माजी सरपंच नारायणशेठ चांगो पाटील, माजी अशोक पदू पाटील, माजी सरपंच वासुदेव हाळुराम पाटील, माजी सरपंच तोयराम गोविंद पाटील, उद्योगपती सुरेशशेठ खानावकर, माजी सदस्य नारायण पाटील, नाथा पाटील, माजी उपसरपंच गोटीराम पाटील, उद्योजक गुरूनाथ पाटील, बाबूराव पाटील, युवा उद्योजक अतुल पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद पाटील, देविदास पाटील, लहू पाटील, नामदेव पाटील, चंदन पाटील, अनंता पाटील, राम पाटील, माजी सदस्य गोमा पाटील, नारायण पदू पाटील, दत्तू पाटील, देविदास पाटील, अनिल पाटील, संतोष पाटील, सुयोग पाटील, सुनील पाटील, अनिल पाटील, अजय पाटील यांच्यासह शेकापच्या अनेेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, भाजप हा विकासासाठी आग्रही, नागरिकांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी आणि विकासकामांसाठी पुढाकार घेणारा, कर्नाळा बँकेतील ठेवीदार आणि खातेदारांना न्याय दिला पाहिजे ही भूमिका घेणारा, कामगारांचे प्रश्न सोडवून त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहणारा पक्ष आहे. म्हणून कोकणातील प्रत्येक जिल्ह्यातील जनता ही भाजपवर विश्वास ठेवत आहे. पुढे बोलताना त्यांनी जनतेने ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला, असा टोला शेकाप पुढार्‍यांना लगावला.
तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत म्हणाले की, ज्यांनी भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला आहे त्यांचा विश्वास सार्थ ठरल्याशिवाय राहणार नाही.
चौकट
विकासासाठी भाजपशिवाय पर्याय नाही -आमदार प्रशांत ठाकूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन संपूर्ण देश त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतो. त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा सर्वांत मोठा पक्ष बनला आहे. विकास करायचा असेल तर भाजपशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही, असे असे प्रतिपादन या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आणि प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.

Check Also

36 घंटे @50; दीड दिवसाचे थरार नाट्य

हिंमत सिंह (सुनील दत्त), त्याचा भाऊ अजित सिंह (रणजीत) आणि या दोघांचा साथीदार दिलावर खान …

Leave a Reply