पुणे : प्रतिनिधी
भाजप नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी (दि. 26) निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. गेल्या दीड वर्षापासून ते आजाराशी झुंजत होते. अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत घडलेल्या गिरीशभाऊंनी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेदांच्या भिंती ओलांडून समाजकार्य तसेच विकासाचे राजकारण केले. टेल्को कंपनीतील कामगार नेत्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुणे महापालिकेचे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री, खासदार पदापर्यंत पोहचला. चार दशकांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत त्यांंना पुणेकरांचे अलोट प्रेम मिळाले.
प्रकृती अस्वास्थ्यातही खासदार बापट हे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत एका मेळाव्यात सहभागी झाले होते. याच दरम्यान रुग्णालयातून थेट भाजपच्या एका जनसंपर्क कार्यालयात दाखल झाल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरांतून शोक व्यक्त होत आहे.
Check Also
कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड
जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …