अलिबाग : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या वक्तव्यप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. अलिबाग मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर ही सुनावणी सुरू होती. केंद्रीय मंत्री राणे यांनी कोकणात जनआशीर्वाद यात्रा काढली होती. यात्रेदरम्यान महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतर राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात राणे यांचे अटकनाट्य रंगले होते. त्यांचे वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांनी गुन्हा शिक्षा करण्याइतका गंभीर नसल्याने तसेच पुरेसा पुरावा दोषारोपपत्रात दिसत नसल्याने राणे यांना दोषमुक्त करण्यात यावे, अशी विनंती न्यायालयाला केली होती. ती न्यायालयाने मान्य केली. अॅड. अंकित बंगेरा, अॅड. महेश मोहिते यांनीही यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …