Breaking News

स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या अस्मितेचे प्रतीक

आमदार प्रशांत ठाकूर यांचे कर्जतमध्ये प्रतिपादन

कर्जत : प्रतिनिधी
सावरकर हे तुमच्या-आमच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेऊन बलिदान दिले, पण हल्लीच्या नवीन पिढीला बलिदान दिलेले हुतात्मे माहित नाहीत. त्यांच्यामुळेच आपण आत्ता आहोत, हे विसरता कामा नये. काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी आपल्या आजीने सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढले, त्याची तरी आठवण ठेवायला पाहिजे. त्यांना व त्यांच्यासारख्या अनेकांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जे देशासाठी बलिदान केले त्यांच्या बलिदानाच्या गौरवाची ही यात्रा आम्ही काढली आहे, असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
भाजप व शिवसेनेतर्फे नेरळहून काढण्यात आलेल्या सावरकर गौरवयात्रेचा समारोप कर्जतच्या टिळक चौकात मंगळवारी (दि. 4) करण्यात आला. या वेळी झालेल्या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते.
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
या वेळी आमदार महेंद्र थोरवे, भाजप तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, शिवसेना तालुकाप्रमुख संभाजी जगताप, दीपक बेहेरे, भाजप किसान मोर्चाचे सुनील गोगटे, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, वसंत भोईर, संतोष भोईर, पंकज पाटील, अशोक ओसवाल, स्नेहा गोगटे, कल्पना दास्ताने, आकाश चौधरी, बळवंत घुमरे, स्वामिनी मांजरे, संकेत भासे, रमेश मुंढे, दिलीप ताम्हाणे आदी उपस्थित होते.
या वेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी, सावरकरांनी भारतभूमीला स्वातंत्र्य मिळावे यासाठी संघर्ष केला. त्यांच्याबद्दल राहुल गांधी जी चिखलफेक करतायेत त्यावरून त्यांनी वडील व आजीचे संस्कार घेतले नसल्याचे दिसत आहे. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींनी पोस्टाच्या तिकिटावर सावरकरांचे चित्र छापण्यासाठी पुढाकार घेतला होता. मुंबईतील सावरकरांच्या स्मारकाला इंदिराजींनी 15 हजार रुपये म्हणजे आत्ताचे सुमारे दीड कोटी रुपये दिले होते. राहुल गांधींनी काढलेले अपशब्द निंदनीय आहेत. सावरकरांच्या बद्दलचे अपशब्द सहन केले जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.
दीपक बेहेरे यांनी, स्वातंत्रवीर सावरकरांवर  जाणीवपूर्वक चिलखफेक केली जाते. त्याला उत्तर देण्यासाठी सावरकर गौरव यात्रेचे आयोजन 288 मतदार संघात केले आहे, असे सांगितले. अनिकेत बगवे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, सावरकर हे संस्कार, प्रेरणा, मन, धन, धगधगता अग्निकुंड आहे. सावरकर समजण्यासाठी त्यांना वाचले पाहिजे, असे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश भगत यांनी केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply