Breaking News

दवाउपचार कामी घेऊन जाताना पत्नीचा अपघातामध्ये मृत्यू; पती गंभीर जखमी

पनवेल : वार्ताहर

तळोजे औद्योगिक वसाहतीमधील आरए एफ सिग्नल जवळ येथे एका भरधाव ट्रकने ओव्हटेक  करणाच्या नादात मोटार सायकलीस ठोकर दिली. या ठोकरमध्ये मोटारसायकलवर बसलेले पती-पत्नी पैकी पत्नी गंभीर जखमी होऊन मयत झाली आहे तर पती गंभीर जखमी झाला आहे.

ठाणे जिल्ह्यातील वालकन येथील प्रविण पांडुरंग पाटील (वय 26) हा त्याची पत्नी रविना प्रविण पाटील (वय 26) हिला घेऊन तिला तळोजा गाव येथे दवाउपचार कामी घेवुन जात असतांना आरएएफ सिग्नल ओलांडत असतांना पाठीमागुन येणारा ट्रक क्रं. एमएच 04 डीडी 2533 वरील अज्ञात चालकाने भरधाव चालवुन ओव्हटेक करीत असताना अचानक डाव्या बाजुस वळवून मोटार सायकलीस ठोकर मारली.

यामध्ये पत्नी रविना हि गंभीर जखमी होऊन मयत पावली तर पती प्रविण पाटील ह्याचा उजवा हात फॅक्चर झाला. याप्रकरणी अज्ञात ट्रकचालकाविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply