Breaking News

अल्पवयीन मुलाने चोरल्या तब्बल 20 सायकली

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील उक्रूळ परिसरातील एका अल्पवयीन मुलाने नेरळ, कर्जत, बदलापूर भागातून सुमारे 20 सायकली चोरून त्यातील काही सायकली उक्रूळ तर काही सायकली नेरळ परिसरात ठेवल्या होत्या. नेरळ पोलिसांनी त्याच्याकडून 18 सायकली ताब्यात घेतल्या असून, त्याच्या गुन्हा दाखल केला आहे.

नेरळ राजेंद्रगुरूनगर येथील संतोष गोविंद शिंगाडे यांनी आपल्या लहान मुलाची सुमारे 9 हजार रुपये किमतीची सायकल कोणीतरी चोरून नेल्याची तक्रार 20एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात दिली होती. आशा प्रकारच्या अनेक तक्रारी आल्याने पोलीस उपनिरीक्षक रतीलाल तडवी, शिपाई वैभव बारगजे, नाईक निलेश निकम, शिपाई अमोल पाटील, होमगार्ड राहुल पाटील यांच्या पथकाचा तपास सुरू होता. नेरळमधील सीसीटीव्हीच्या माध्यमातून तसेच अनेक मार्गाने तपास करत सायकल चोरणारा  उक्रूळ गावातील अल्पवयीन मुलगा असल्याचे निष्पन्न झाले.  नेरळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने नेरळ, बदलापूर, कर्जत परिसरातून सायकली चोरल्या असल्याचे कबूल केले. त्याने चोरलेल्या सुमारे 2लाख रुपये किमतीच्या 18 सायकली नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतल्या. यातील 5 सायकल मालकांचा शोध लागला असून, बाकीच्या सायकली कोणाच्या आहेत, हे कळाले नसल्याने कोणाची सायकल हरवली असल्यास नेरळ पोलीस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी केले आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply