Friday , September 29 2023
Breaking News

पनवेलच्या चहाविक्रेत्याचा केंद्र सरकारतर्फे दिल्लीत सत्कार

पनवेल : देशमुख
प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत कर्ज घेऊन त्याची परतफेड व्यवस्थितरित्या केल्याने रस्त्यावर चहा विक्रीचा व्यवसाय करणार्‍या पनवेलच्या रवींद्र मगर यांचा नुकताच केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयातर्फे दिल्लीत सत्कार करण्यात आला. या सत्कारामुळे ते भारावून गेले.
सत्कार समारंभास केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीपसिंग पुरी, प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधीचे सचिव मनोज जोशी, गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाचे सहसचिव राहुल कपूर, महाराष्ट्राच्या नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे उपायुक्त रोहिदास गुरुकुलकर, राज्य अभियानाचे व्यवस्थापक रवींद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
या सत्कारासाठी महाराष्ट्रातून दोघांची निवड करण्यात आली होती. यामध्ये पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाजवळील पदपथावरील चहाविक्रेते रवींद्र काशिनाथ मगर आणि ठाण्यातील अब्बास खान यांचा समावेश होता. भारत सरकारतर्फे दिल्ली येथे झालेला सत्कार हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना आहे, असे मगर यांनी या वेळी सांगितले.

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply