Friday , September 22 2023

तलावामध्ये बुडून महिलेचा मृत्यू

पनवेल : वार्ताहर
पनवेल तालुक्यातील घोटकॅम्प जवळील घोटनदीच्या पात्रातील तलावामध्ये बुडुन एका 43 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
घोटगाव येथे राहणारी निता निलेश प्रधान हि महिला आपल्या राहत्या घरातून कोणाला काही एक न सांगता निघून गेली होती. याप्रकरणी तळोजा पोलीस तपास करत असताना सदर महिला घोटकॅम्प जवळील घोटनदीच्या पात्रातील तलावामध्ये मिळून आली. तिला उपचाराकामी पनवेल उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मयत घोषीत केले. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे करीत आहेत.

Check Also

दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन

अलिबाग ः प्रतिनिधी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीम पथके तसेच गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात अवघ्या …

Leave a Reply