Breaking News

पनवेलमध्ये रविवारी ‘कर्नाळा एक ढासळलेला बुरूज’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

पनवेल : रामप्रहर वृत्त
कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीतर्फे कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या संघर्षाची माहिती देणार्‍या ‘कर्नाळा एक ढासळलेला बुरूज’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी (दि. 25) दुपारी 3 वाजता माजी खासदार व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांच्या उपस्थितीत पनवेल शहरातील गोखले हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.
ठेवीदारांनी विश्वासाने माजी आमदार विवेक पाटील यांच्याकडे दिलेली आयुष्याची पुंजी मातीमोल झाली. ती परत मिळवून देण्यासाठी आणि कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांवर झालेल्या अन्यायाला सर्वप्रथम आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाचा फोडली. ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे परत देण्याची सर्व स्तरावर मागणी, मोर्चे, आंदोलन, पाठपुरावा अशी सर्व लढाई त्यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या मार्गदर्शनाखाली लढली आणि त्यात ते यशस्वीही झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दूरदृष्टी व विश्वासार्हतेतून आणि केंद्र सरकारच्या विमा संरक्षणाच्या ऐतिहासिक निर्णयातून ठेवीदारांना त्यांचे विमा संरक्षणाचे पैसे मिळाले. समितीचे अध्यक्ष महेश बालदी व कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून हे शक्य झाले.
समाजामध्ये ज्यांच्याविषयी विश्वासार्हता होती आणि ज्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक, राजकीय हजारो लोकं जोडली जातात व आपल्या आयुष्यभराच्या मेहनतीची कमाई डोळे मिटून एखाद्या बँकेत ठेवतात अशा विश्वासार्हताचे बुरुज एकाएकी कसे ढासळतात याची माहिती आणि ठेवीदारांचा संघर्ष ‘कर्नाळा एक ढासळलेला बुरूज’ या पुस्तकात अधोरेखित करण्यात आला आहे. या प्रकाशन सोहळ्यास ठेवीदार व त्यांच्या हितचिंतकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष आमदार महेश बालदी, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply