Breaking News

लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त
सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रांतील लोकप्रिय नेतृत्व असलेले कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसनिमित्त विविध सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आले होते. त्याचबरोबर वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतील मान्यवरांनी तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, हितचिंतकांनी कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांना शुभेच्छा देऊन अभीष्टचिंतन केले.
संघटन कौशल्य आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव असलेले क्रियाशील आमदार प्रशांत ठाकूर यांचा शनिवारी (दि. 5) 49वा वाढदिवस होता. लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत आमदार प्रशांत ठाकूर यांच्याबद्दल कायम आदर पहायला मिळते. त्यांनी आपल्या विधायक कार्यातून अफाट लोकप्रियता प्राप्त केली आहे. सलग तीनवेळा आमदार होऊनसुद्धा त्यांच्या वर्तनात कधीही बडेजाव दिसत नाही. त्यामुळे त्यांचे लाखोंच्या संख्येने हितचिंतक आहेत. त्या अनुषंगाने वाढदिवसानिमित्त राज्यभरातून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, राजकीय, कला, सांस्कृतिक, वैद्यकीय, विधितज्ज्ञ, पोलीस, शासकीय अधिकारी, पत्रकारिता, विविध संस्था, संघटना, निरनिराळ्या पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी त्यांचे अभीष्टचिंतन केले.
लोकप्रतिनिधी म्हणून उत्कृष्ट काम करणारे, समाजाची जाण असलेले व्यक्तिमत्त्व आणि पक्ष संघटना जबाबदारी यशस्वीपणे बजावणे, पनवेल त्याचबरोबर जिल्हा किंवा जिल्ह्याबाहेर आलेल्या नैसर्गिक आपत्ती, आपत्कालीन परिस्थितीत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर यांनी सढळ हस्ते मदत आणि धीर देण्याचे काम केले असल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पहिले आहे, मात्र हे कार्य त्यांनी कधीही सवंग लोकप्रियता किंवा प्रसिद्धीसाठी केले नाही. माणूस आणि माणुसकी म्हणूनच त्यांच्याकडून विधायक कार्य घडत आले आहे. सर्व क्षेत्रांत आमदार प्रशांत ठाकूर यांचे भरीव योगदान आहे. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हा लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वसा त्यांनी सांभाळला आहे. सतत सर्व समाजाच्या विकासाचा ध्यास घेऊन समाजाला कोणती गरज आहे हे लक्षात घेऊन ऊन, पावसाची तमा न बाळगता ते कार्य करत असतात. त्यामुळे वाढदिवसानिमित्त कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून अभीष्टचिंतनाचा वर्षाव झाला.
वाढदिवसाला हजारोंच्या संख्येने हितचिंतक शुभेच्छा देत असतात. अशावेळी पुष्पगुच्छ, भेटवस्तू त्याचबरोबर बॅनरद्वारे शुभेच्छा दिल्या जातात. तसे न करता वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, भेटवस्तू तसेच बॅनरबाजीऐवजी सामाजिक सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आवाहन केले होते. त्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नादब्रह्मा साधना मंडळ खारघर व पनवेल तालुका सांस्कृतिक सेलच्या विद्यमाने पनवेलमध्ये शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन कार्यक्रम, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व बॅडमिंटन असोसिएशन ऑफ रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने रामशेठ ठाकूर बॅडमिंटन ट्रॉफी 2023 स्पर्धा, सरचिटणीस व माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जाणीव एक सामाजिक संस्थेच्या वतीने आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरित्रावर आधारित सामगंध प्रस्तुत गीतरामायण कार्यक्रम, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्या रत्नदीप स्पोर्ट्स क्लबच्या वतीने धाकटा खांदा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व ज्येष्ठ नागरिकांना छत्रीवाटप, माजी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या उत्कर्ष सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने पोदी येथे आयुष्यमान भारत कार्ड, श्रम कार्ड तसेच पाच वर्षापर्यंतच्या बालकांचे आधार कार्ड बनवणे आणि वाटप कार्यक्रम, युवा नेते केदार भगत यांच्या वतीने लोकनेते दि. बा. पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय साहित्यवाटप, माजी नगरसेवक राजेंद्र शर्मा यांच्यातर्फे खारघरमध्ये गरीब नागरिकांना अल्पोहार तसेच आसुडगाव येथील गो शाळेत गायींना चारा वाटप, गोपीनाथ भगत सामाजिक विकास मंडळाच्या वतीने कामोठे येथे मोफत ई-सेवा सुविधा शिबिर, माजी नगरसेवक अमर पाटील यांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांची ग्रंथतुला, सेवा सन्मानिमित्त सफाई कामगार आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा असे विविध सामाजिक उपक्रम अनेक ठिकाणी आयोजित करण्यात आले.
नेतेमंडळींकडून शुभेच्छा
अभ्यासू, कार्यतत्पर, आमदार प्रशांत ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त राज्यभरातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह विधिमंडळातील लोकप्रतिनिधी यांनीही शुभेच्छा दिल्या.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply