दहीहंडी श्री राघोबा देव गोविंदा पथकाने फोडली
उरण ः वार्ताहर
गोपाळकालाचा उत्साह आणि मुसळधार पावसात दहीहंडी उत्सव उरणमध्ये पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. भाजप उरण व महेश बालदी मित्र मंडळ आयोजित तिर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्राथमिक शाळा पेन्शनर पार्क उरण येथे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तालुक्यातील 22 गोविंदा पथकांनी सलामी दिली. त्यात उरण कोटनाका येथील श्री राघोबा देव गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली. विजेच्या गोविंदा पथकांना भव्य सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयवीन कोळी, शहर भाजप अध्यक्ष तथा माजी नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक राजू ठाकूर, नगरसेविका जान्हवी पंडित, आशा शेलार, प्रियांका पाटील, शहर भाजप महिला मोर्चा अध्यक्ष संपूर्णा थळी, नगरसेवक नंदू लांबे, उद्योजक सुनील पेडणेकर, हितेश शाह, मनन पटेल, मनोहर सहतीया, नवीन राजपाल, अजित भिंडे, हस्तीमल मेहता, निलेश कदम, संतोष ओटावकर, मकरंद पोतदार, देवेंद्र घरत, कैलास भोईर, जगदीश पाटील, सागर मोहिते, राजेश कोळी, मदन कोळी व महेश बालदी मित्र मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. उरणमधील विविध गोविंदा पथके सकाळपासूनच लाखांच्या दहिहंडी फोडण्यासाठी उत्सुक होते. मुसळधार पावसाने सकाळपासूनच हजेरी लावल्याने गोविंदाचा आनंद व्दिगुणित झाला होता. उरणमध्ये 22 गोविंदा पथके सहभागी झाले होते. या गोविंदा पथकांनी उरण नगर परिषदेच्या मराठी शाळेतील प्रांगणात भाजपाने आणि राष्ट्रवादीने उभारलेल्या दहीहंड्यांना सहा-सात थर लावून सलामी दिली. उरण परिसरातील असलेल्या लाखांच्या सार्वजनिक दहीहंड्या संध्याकाळपर्यंत तरी फुटल्या नव्हत्या. चिरनेरच्या कातळपाडा येथील बाल गोपाळ मित्र मंडळ गोविंदा पथकाच्या वतीने यावर्षी प्रथमच दहीहंडीचा उत्सव आयोजित करण्यात आला होता. डीजेच्या तालावर दहीहंडी फोडण्याच्या कसरती करीत बच्चे कंपनीने दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश पंडित यांनी केले.
Check Also
सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक
प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …