पनवेल : रामप्रहर वृत्त
राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती अर्थात सेवा पंधरवड्यानिमित्त स्वच्छता ही सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. यांच्या वतीने रविवारी (दि. 1) पनवेल शहरातील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ आयोजित करण्यात आला आहे.
कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मोहिमेचे उद्घाटन सकाळी 10 वाजता पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते होणार असून या वेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती असणार आहे.
Check Also
कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड
जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …