Breaking News

‘रामप्रहर’चा सायबर क्राईमवर आधारित दिवाळी अंक जनजागृतीसाठी उपयुक्त ठरेल

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विश्वास

पनवेल ः रामप्रहर वृत्त
वाढत्या सायबर क्राईम घटनांचा आढावा घेणारा व जनजागृतीपर ठरणारा दैनिक रामप्रहरचा यंदाचा दिवाळी अंक वाचकांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 7) व्यक्त केला. ते दिवाळी अंक प्रकाशन समारंभात बोलत होते.
रायगड, नवी मुंबईत वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘रामप्रहर’ने ऑनलाईन गंडा या शीर्षकाखाली दिवाळी अंक प्रसिद्ध केला आहे. या अंकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या वेळी त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
प्रकाशन समारंभास भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी.देशमुख, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ.एस.टी.गडदे, मल्हार नेटवर्क प्रा. लि.चे संचालक दर्शनशेठ ठाकूर, ‘रामप्रहर’चे मुख्य संपादक देवदास मटाले, व्यवस्थापक दादाराम मिसाळ, वृत्त संपादक समाधान पाटील, उपसंपादक तन्वी गायकवाड-पवार, सायली रावले-वैद्य, आर्टिस्ट शशिकांत बारसिंग, वितरण विभागाचे महेश काळे आदी उपस्थित होते.
‘रामप्रहर’च्या दिवाळी अंकासाठी मुख्य आर्टिस्ट अरुण चवरकर, सुबोध ठाकूर, लेखापाल उद्धव घरत, कार्यालयीन कर्मचारी करण वाहुळकर यांचेही योगदान लाभले आहे.

Check Also

झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!

‌‘पुरवैय्या‌’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …

Leave a Reply