Breaking News

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग

पनवेल ः वार्ताहर

अल्पवयीन मुलीला स्वतःच्या दुकानातील गाळ्यात बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करणार्‍या एका टेलरला पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. करंजाडे येथे टेलर काम करणारा राजेश त्रिभुवन सिंग (29) याने त्याच्या दुकानाजवळील असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये खेळत असलेल्या नऊ वर्षीय मुलीस दुकानात बोलावून दुकानाचे शटर खाली खेचून अतिप्रसंग केला. याबाबतची माहिती मुलीने आईला देताच रहिवाशांच्या मदतीने राजेश सिंग याला ताब्यात घेऊन पनवेल शहर पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. टेलरविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास वपोनि विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम करीत आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply