Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 12 जानेवारीला शिवडी-न्हावाशेवा सी लिंक प्रकल्पाचे लोकार्पण

50 हजारांपेक्षा जास्त नागरिकांची असणार उपस्थिती; नियोजन बैठकीतून आढावा

पनवेल : रामप्रहर वृत्त
देशाचे लोकप्रिय व यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारीला अटल सेतू अर्थात शिवडी-न्हावा सी लिंक या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. या वेळी होणार्‍या कार्यक्रमास 50 हजारपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहणार आहेत. त्या अनुषंगाने उलवे नोड येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि.2) नियोजन आढावा बैठक पार पडली.
रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या बैठकीस माजी खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, माजी आमदार धैर्यशील पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मोहपे, कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष अनिल भगत, उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, माजी महापौर कविता चौतमोल, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, खोपोली तालुकाध्यक्ष रमेश रेटरेकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे, ठाणे विभाग संघटन मंत्री हेमंत म्हात्रे, राजेश मपारा, मिलिंद पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते.
उरण-पनवेलमध्ये होणारे विकासात्मक टप्पे पाहता हे एक हब निर्माण होत आहे. नवी मुंबई विमानतळ आणि या सी-लिंकमुळे जगाशीही थेट संबंध या परिसराचा येणार आहे. त्याचबरोबर आता हा परिसर व मुंबई हाकेच्या अंतरावर आले आहे. त्याचा फायदा रायगड, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पालघर अशा सर्वच भागातील प्रवाशांना होणार आहे तसेच या भागातील गावांचा झपाट्याने विकास होणार आहे. त्या अनुषंगाने हा प्रकल्प येथील लोकांसाठी महत्त्वपूर्ण असा आहे.
या प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून सभा नवी मुंबई विमानतळ परिसरातील भव्य मैदानावर होईल. त्यांचे मोलाचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी 50 हजारपेक्षा जास्त नागरिक या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी नागरिकांची बैठक व्यवस्था, प्रवास, अल्पोहार आदी व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नियोजन बैठक झाली. या वेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन करून आवश्यक त्या सूचना केल्या.

Check Also

संकट काळात ठाकूर कुटुंबियांनी केलेली मदत जनता विसरणार नाही -जरीना शेख

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर …

Leave a Reply