Breaking News

पनवेलच्या रोहिदास वाड्यात तीन कोटींची विकासकामे

भाजप शहर अध्यक्ष अनिल भगत यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल शहरातील रोहिदास वाड्यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे तीन कोटी रुपयांची विकासाची कामे होणार आहे. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार्‍या या कामांचे भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 4) भूमिपूजन झाले. भारतीय जनता पक्ष अणि विकास हे एक समीकरण बनले आहे. त्यानुसार पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासाची कामे सुरू आहेत. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून रोहिदास वाड्यात अंतर्गत रस्त्याच्या दोन्ही बाजूस गटार बांधणे, रस्ता काँक्रीटीकरण करणे, पाण्याची पाईपलाईन टाकणे, अंतर्गत गल्ल्यांमध्ये पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम तीन कोटी 22 लाख 30 हजार 757 खर्चून करण्यात येणार आहेत. या विकास कामांचे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत यांच्या हस्ते झाले. या वेळी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक राजू सोनी, माजी नगरसेविका रूचिता लोंढे, प्रभाग क्रमांक 19चे अध्यक्ष पवन सोनी, बुथ अध्यक्ष प्रवीण मोहोकर, मधुकर उरणकर, रजनीश जाधव, निर्मला तैती, तानाजी झुगे, बाब्या जाधव, उमेश भास्कर, सचिन उरणकर, सुदेश खैरे, गजानन जाधव, विलास गायकवाड, मंदार देसाई, किशोर मोहोकर, यतीन देशमुख, जयेंद्र ठाकूर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply