Breaking News

सीकेटी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी कार्य करणारे महाविद्यालय-कुलगुरू प्रो. डॉ. रजनीश कामत

पारितोषिक वितरण समारंभ आणि दर्पण उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगु काना ठाकूर(सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचा (स्वायत्त) वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि दर्पण 2024 बुधवारी (दि.7) मोठ्या उत्साहात झाला. या वेळी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करण्यासाठी प्रमुख अतिथी डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबईचे कुलगुरू प्रो. डॉ. रजनीश कामत यांनी, सीकेटी महाविद्याल हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करणारे महाविद्यालय आहे, असे गौरवोद्गार काढले.
या वेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची विशेष उपस्थिती लाभली. सोबतच प्रमुख मान्यवर म्हणून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य संजय पाटील, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे संचालक डॉ. श्रीनिवास कुलकर्णी, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबईचे निबंधक डॉ. विलास पाध्ये व इंनोवेशन आणि इन्क्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. विशाल बानेवार, एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे प्रा. डॉ. समाधान वाघमोडे, अ‍ॅड. विनायक कोळी आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला लाभली. त्याचबरोबर प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील, कला शाखेचे प्रमुख प्रो. डॉ. बी. एस. पाटील, वाणिज्य शाखेचे प्रमुख प्रो. डॉ. एस. बी. यादव, विज्ञान शाखेच्या प्रमुख डॉ. जे. एस. ठाकूर आणि आय. क्यू. ए. सी. विभागाचे समन्वयक प्रो. डॉ. बी. डी. आघाव, रुसा समन्वयक डॉ. एस. एन.वाजेकर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरवातीला एनसीसीच्या पथकाने उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांनी रोपटे देऊन उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. महाविद्यालयातील क्रीडा, कला, संशोधन, सेवा क्षेत्रातील ज्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश प्राप्त केले अशा विद्यार्थ्यांचा आणि महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील शैक्षणिक पात्रता वृद्धिंगत करणारे प्राध्यापक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा नृत्य, गायन, आणि अभिनय यांचा कला संगम असणारा दर्पण 2024 हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा झाला. या कार्यक्रमास प्रसिद्ध मराठी अभिनेते गौरव मोरे यांची उपस्थिती लाभली.
प्रमुख अतिथी डॉ. रजनीश के. कामत यांनी सांगितले की, कोणत्याही कामाचा तणाव न घेता त्या कामाचा आनंद घेतला पाहिजे. आयुष्य हे खूप छोटे आहे त्यामुळे आयुष्याचा आनंद घेत आपले ध्येय गाठायचे आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी, विद्यार्थ्यांच्या शिस्तीचे आणि संयमाचे तसेच त्यांच्या घवघवीत यशाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या पालकांचेसुद्धा कौतुक केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभागाचे समन्वयक गणेश जगताप, प्रमुख डॉ. गीतिका तंवर आणि विद्यार्थी परिषद आणि विद्यार्थी कल्याण विभागाच्या समन्वयक डॉ. मंदा म्हात्रे यांनी अथक परिश्रम घेतले. इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. राजेश येवले, सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख डॉ. गीतिका तंवर, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. आकाश पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Check Also

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते सात कोटी 11 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ

शेकाप, उबाठाचे कार्यकर्ते भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघात किमानपाच हजार कोटी रुपयांचा निधी …

Leave a Reply