Breaking News

खोपटा गावाजवळ भरधाव बसने दुचाकी, टेम्पोला उडवले

एकाचा मृत्यू; दुसरा जखमी

उरण : प्रतिनिधी
भरधाव वेगातील एनएमएमटी बसने कोप्रोली-नवघर रस्त्यावर खोपटे गावाजवळ प्रवास करणार्‍या दोन मोटरसायकल स्वारांसह टेम्पोला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वार निलेश शशिकांत म्हात्रे (वय 28) याचा नवी मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असतांना रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर खोपटे येथील चायनीज दुकानदार केशव आत्माराम ठाकूर (वय 52) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नातेवाईकांच्या मदतीने कोप्रोली येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
निष्पाप तरुणाचा अपघात मृत्यू झाल्याने खोपटा गाव परिसरातील संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करून भरधाव वेगातील वाहनांना आवरण्याची मागणी केली. खोपटा, कोप्रोली व चिरनेर वशेणी, केळवणे, आवरे या मार्गांवरील प्रवाशी नागरीकांच्या रस्त्यावर अवजड वाहनांची रेलचेल असल्याने सदर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर वारंवार अपघात होण्याची संख्या बळावली आहे. यात रस्त्यावरील उकडलेल्या साईट पट्यांचा तसेच खडबडीत रस्त्याचा अंदाज एनएमएमटी बसचालकाला न आल्याने भरधाव वेगातील एनएमएमटी बसने खोपटा- कोप्रोली रस्त्यावरुन प्रवास करणार्‍या दोन मोटारसायकल स्वारांना व टेम्पोला जोरदार धडक दिल्याची दुर्घटना गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. या झालेल्या अपघात पाच मोटरसायकल स्वार थोडक्यात बचावले असले तर दोन मोटरसायकल स्वारांना फरफटत नेल्याने झालेल्या अपघात निलेश म्हात्रे याचा मृत्यू झाला असून केशव ठाकूर हे जखमी झाले असून त्यांच्या पायाच्या गुडघ्याला मार लागला आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. एनएमएमटी बसमधील प्रवाशी नागरीकांना किरकोळ दुखापत झाली. या अपघाताची माहिती मिळताच उरण पोलिसांचे पथक उरण वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply