Breaking News

सौरव गांगुलीला बुधवारी मिळणार डिस्चार्ज

कोलकाता : वृत्तसंस्था
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली याची प्रकृती स्थिर असून, बुधवारी (दि. 6) त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. गांगुलीली घरी सोडल्यानंतर डॉक्टरांकडून त्याच्या प्रकृतीची रोज माहिती घेतली जाणार आहे, असेही सांगण्यात येत आहे.
सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सकाळी जिममध्ये व्यायाम करत असताना त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली आणि त्याला रूग्णालयात घेऊन जाण्यात आले. दक्षिण कोलकाता येथील वूडलँड या खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. सोमवारी हॉस्पिटलमधील नऊ डॉक्टर्सच्या टीमने गांगुलीच्या प्रकृतीची नीट माहिती घेतली. या वेळी डॉ. देवी शेट्टी, डॉ. आरके पंडा हे व्हिडीओद्वारे, तर डॉ. सॅम्युअल मॅथ्यू फोनद्वारे या टीमशी जोडले गेले होते. त्यानंतर गांगुलीच्या प्रकृतीबाबतची महत्त्वाची अपडेट देण्यात आली.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी …

Leave a Reply