जनार्दन भगत शिक्षक प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयाचा एनसीसी रहिवाशी कॅम्प संपन्न
रामप्रहर वृत्त:
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील भागूबाई चांगु ठाकूर विधी विद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS-National Service Scheme) सात दिवसीय रहिवाशी शिबीर तारा येथील ग्राम विकास प्रकल्प ‘युसूफ मेहरली सेंटर’ याठिकाणी संपन्न झाले. या शिबिरात बीएलएस आणि एल.एल.बी.च्या विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्वक सहभाग दर्शविला.
तर, या आयोजित शिबिराचा प्रारंभ जागतिक महिला दिनी झाला. शिबिरात पोस्टर मेकिंग, सामाजिक मुद्द्यावरील पथनाट्य, ट्रेकिंग, श्रमदान, योगा व व्यायाम, ध्यान करणे, सांस्कृतिक उपक्रम, व्यक्तीमत्व विकास, स्वरक्षण, पर्यावरण जपवणून व संरक्षण इत्यादी शारीरिक विकासाचे आणि बौद्धिक विकासंतर्गत प्रसार माध्यमांचा देश उभारणीतील प्रभाव, कायदेशीर सुधारणा आणि तरुणांच्या योगदानाद्वारे राष्ट्रीय विकास अश्या मुद्द्यांवर तज्ञ वक्त्यांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. तसेच, विद्यार्थ्यांसोबतच विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या सानवी देशमुख, प्राध्यापिका डॉ. ममता गोस्वामी, प्राध्यापिका अपराजिता गुप्ता, प्राध्यापिका डॉ. क्रांती भोईटे (NSS शिबीर कार्यक्रम अधिकारी), उज्वल पाटील, ऋषिकेश हुडार, संजय देशमुख, प्रमोद कोळी, नितीन कोळी इत्यादींनी शिबिरात आपली उपस्थिती दर्शवली. अशी माहिती NSS कॅम्पचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक राघव शर्मा यांनी दिली. तर, या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप कार्यक्रम संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, ऍड. विनायक कोळी, प्राचार्या सानवी देशमुख, देविदास पाटील इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.