Breaking News

दहशत निर्माण करणार्‍यांना चोख उत्तर द्या

-भाजप उमेदवार सुजय विखे-पाटील यांचे आवाहन
-कामोठे येथे संवाद मेळावा उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त
दहशत निर्माण करणार्‍यांना चोख उत्तर द्या, असे आवाहन नगर मतदारसंघातील भाजप उमेदवार सुजय विखे-पाटील यांनी केले आहे. ते रविवारी (दि.7) कामोठे येथील पारनेरवासियांच्या संवाद मेळाव्यात बोलत होते.
विजयभाऊ औटी मित्र परिवार आणि कामोठे रहिवासी सांस्कृतिक युवा मित्र मंडळ यांच्या वतीने संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या वेळी पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी, माजी नगरसेविका मोनिका महानवर, बाबासाहेब खिलारे, बाबासाहेब तांबे, युवा नेते हॅप्पी सिंग, माजी नगरसेवक विकास घरत, कामोठे शहर प्रमुख रवींद्र जोशी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, विद्या तामखेडे, प्रदीप भगत, विजय चिपळेकर, रमेश तुपे, तेजस जाधव, वनिता पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी, येणार्‍या नगर लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील हे साडेतीन लाखांहून अधिक मताधिक्याने निवडून येतील, यात मला शंका वाटत नाही, असा विश्वास यांनी व्यक्त केले.
सुजय विखे-पाटील पुढे म्हणाले की, पारनेरच्या गोरगरीब जनतेने याआधी दहशतीत आयुष्य जगले, मात्र आता तुम्हाला दहशतीत जगू देणार नाही. पारनेर आणि अहिल्यादेवी नगरच्या जनतेला या वातावरणातून बाहेर काढण्यासाठी मला लोकसभेत जाण्याची संधी द्यावी. किती गोळ्या घालायच्या तेवढ्या घाला, मात्र सुजय विखे पाटील मागे हटणार नाही. सुजय विखे-पाटील समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करणार हे स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या, असे आव्हान त्यांनी केले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply