Breaking News

निकालाची उत्कंठा शिगेला

अलिबाग ः प्रतिनिधी

रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी अलिबाग तालुक्यातील  नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलात गुरुवारी (दि. 23) होणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. नुकतीच मतमोजणीसंदर्भातील रंगीत तालीमही घेण्यात आली होती. या मतदारसंघात केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार अनंत गीते आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यात चुरशीची लढत झाली आहे. आता रायगडचा खासदार कोण हे गुरुवारी स्पष्ट होणार आहे. या मतदारसंघात अटीतटीची लढत असल्यामुळे निकालाबाबत सर्वांचीच उत्कंठा शिगेला पोहचली आहे.  

2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचा केवळ 2100 मतांनी पराभव केला होता. या पराभवाचे उट्टे तटकरे काढणार का? की अनंत गीते रायगड लोकसभा मतदारसंघात विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 रायगड लोकसभा मतदारसंघात अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड, दापोली, गुहागर असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. एकूण 16 लाख 51 हजार 560 मतदारांपैकी 10 लाख 20 हजार 140 मतदारांनी मतदान केले आहे. 61.76 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सहा विधानसभा मतदारसंघनिहाय होणार्‍या प्रत्येक मतमोजणीसाठी प्रत्येकी 14 टेबल्स असणार आहेत. त्यानुसार एकूण लोकसभा मतदारसंघाच्या 156 फेर्‍या होणार आहेत. सर्वाधिक 28 फेर्‍या महाड आणि सर्वात कमी 23 फेर्‍या गुहागर विधानसभा मतदारसंघाच्या होणार आहेत. मतमोजणीस सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे.

मतमोजणीसाठी पर्यवेक्षक, सहा. पर्यवेक्षक, सूक्ष्म निरीक्षक असे 360 जण असणार आहेत. याव्यतिरिक्त संगणक कामासाठी, ईव्हीएम स्ट्राँगरूममधून आणणे, त्यांची सुरक्षा, टपाली मतपत्रिका मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच मतमोजणीच्या 21 समित्याही तयार करण्यात आल्या आहेत.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply