Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त एक झाड आईसाठी महावृक्षारोपण उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त
समाजप्रिय नेतृत्व असलेले कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि. 5) विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यानुसार मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा, महिलांना कर्करोग प्रतिबंधक लस, भजन स्वरपुष्प, क्रीडा स्पर्धा, शालेय साहित्य वाटप असे विविध सामाजिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाले. तत्पूर्वी आमदार प्रशांत ठाकूर यांनी वडील माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व आई शकुंतला ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले. वाढदिवसानिमित्त राज्यातील नेतेमंडळींसह, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, विधी, वैद्यकीय, पत्रकारिता आदी क्षेत्रातील मान्यवरांसह विविध संस्था, संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांनी त्यांचे अभीष्टचिंतन केले.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार एक झाड आईसाठी हा उपक्रम देशभर राबविला जात आहे. त्या अनुषंगाने कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून केलेल्या आवाहनानुसार आयोजित कार्यक्रमात हजारो रोपांची लागवड करण्यात आली. एखाद्या कार्यक्रमात रोप भेट दिल्याने त्या कार्यक्रमाचे स्वरूप बदलून जाते, त्याचप्रमाणे वृक्षारोपण आणि त्याचे संवर्धन केल्याने मानवी जीवनास अनुकूल असे वातावरण निर्माण होते. यंदाच्या उन्हाळ्यात 40 डिग्रीपेक्षा जास्त तापमान सर्वांना अनुभवायला मिळाले. या पार्श्वभूमीवर आपण वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनावर भर देण्याची गरज आहे या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनानुसार पनवेल तालुक्यातील आंबिवली (नेरे) येथे जवळपास दोन हजार रोपांची लागवड करण्यात आली आणि त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेने घेतली आहे.
वाढते औद्योगिकीकरण, इमारतींचे पसरणारे जाळे, अमर्याद वृक्षतोड यामुळे निसर्गाची मोठी हानी होत आहे. त्याचा परिणाम पर्जन्यवृष्टीवर होत असल्याने अवकाळी पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, पिकांचे नुकसान, भूकंप, महापूर, अनियमित ऋतूमान, वाढते प्रदूषण अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आपण पाऊस आणि निसर्गाला दोष देऊन मोकळे होतो, पण मानव म्हणून निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करतानाच वृक्षरोपण व वृक्षसंवर्धन असा उपक्रम या निमित्ताने राबविण्यात आला.
ज्येष्ठांचे आशीर्वाद माझ्यासाठी बहुमोल -आमदार प्रशांत ठाकूर
चंदनाप्रमाणे झिजून ज्येष्ठांनी आपले आयुष्य कुटुंब व समाजासाठी वेचले आहे. त्यांच्या अमूल्य मार्गदर्शनातून समाज घडत आहे. त्यामुळे ज्येष्ठांचे आशीर्वाद माझ्यासाठी बहुमोल आहेत, असे उद्गार लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर येथे काढले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त खारघरचा राजा संस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा, छत्रीवाटप तसेच ज्येष्ठ महिलांना साडी व ज्येष्ठ पुरुषांना शर्ट व पॅन्टपीस वाटप करण्यात आले. त्या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ नागरिकांसह विविध संस्था-संघटना तसेच समाजाच्या प्रतिनिधींनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे अभीष्टचिंतन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार धैर्यशील पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, खारघर शहराध्यक्ष प्रवीण पाटील, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, कार्यक्रमाचे आयोजक विजय पाटील, माजी सरपंच विजया पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच आशीर्वादाबद्दल ज्येष्ठ नागिरकांचे मनःपूर्वक आभार मानले. ज्येष्ठांचे मार्गदर्शन नेहमीच प्रेरणादायी ठरल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेच्या माध्यमातून सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहे आणि वर्षातून किमान 20 कार्यक्रम ते आयोजित करून समाजाची मोठी सेवा करत असल्याचे सांगून खारघरचा राजा संस्थेचे आणि त्यांच्या पदाधिकार्‍यांचे कौतुक केले. महिलांच्या सन्मानासाठी सरकारने माझी लाडकी बहीण योजना अमलात आणली, उच्च शिक्षण घेण्यासाठी मुलींना आर्थिक पाठबळ, दरवर्षाला तीन सिलिंडर मोफत अशा विविध योजना आणल्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचे आभार मानत असून अशा विविध योजनांच्या माध्यमातून सरकार लोकापर्यंत पोहचत असल्याचेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी नमूद केले.
सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर
कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, रायगड जिल्हा उत्तर भारतीय मोर्चा, नमो नमो मोर्चा, पंडित पारसनाथ शर्मा चॅरिटेबल ट्रस्ट आणि सखी वूमन वेल्फेअर यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर येथे 9 ते 18 वयोगटातील मुलींसाठी सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर पार पडले.
या शिबिराला लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, खारघर शहराध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक शत्रुघ्न काकडे, नरेश ठाकूर, गुरूनाथ गायकर, माजी नगरसेविका संजना कदम, नेत्रा पाटील, प्रशांत कदम, समीर कदम, दिलीप जाधव, आयोजक संतोष शर्मा, साधना पवार, रामचंद्र पाटील, श्री. अमित, राजेंद्र मांजरेकर, अजय माळी, स्नेहा जाधव, सुरेश म्हात्रे, अमर उपाध्याय, निर्मला यादव, संदेश वर्मा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply