Breaking News

कृत्रिम हातपाय बसविण्याचे शिबिर यशस्वी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ पनवेल, साधू वासवानी मिशन पुणे, भारतीय जनता पक्ष, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन, फिनोलेक्स केबल्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने जयपूर फूट बसविण्याचे शिबिर मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. 22) झाले.
मोफत कृत्रिम हात व पाय अर्थात जयपूर फूटसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ऑगस्ट महिन्यात शिबिर झाले होते. या शिबिरात हात, पाय नसलेल्या दिव्यांग व्यक्तींची तपासणी करून त्या अनुषंगाने कृत्रिम हात, पायासाठी मापे घेतली गेली होती. अशा व्यक्तींना हे कृत्रिम अवयव रविवारी पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात बसविण्यात आले.
या शिबिरास श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, माजी नगरसेवक अरुणकुमार भगत, भाजप सांस्कृतिक सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, जयपूर फूट प्रोजेक्ट हेड मिलिंद जाधव, साधू वासवानी मिशनचे प्रतिनिधी डॉ. सलील जैन, सुशील ढगे, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि साधू वासवानी मिशन कॉर्डिनेटर डॉ. सचिन जाधव, मंडळाचे कार्यालयीन सचिव अनिल कोळी यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्याम पुंडे यांनी केले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply