पनवेल : रामप्रहर वृत्त
थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस बुधवारी (दि. 7) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, शकुंतला रामशेठ ठाकूर, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, अरुणशेठ भगत, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिकांनी अभिवादन केले.
कष्टकर्यांचे द्रष्टे नेते स्व. जनार्दन भगत यांच्यामुळे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला. अहोरात्र समाजाची सेवा हाच त्यांचा उद्देश कायम राहिला. 84 गावांचा न्याय निवाडा करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही याची त्यांनी सामाजिक भूमिकेतून काळजी घेतली. त्यांनी सर्व समाजासाठी आपले आयुष्य वेचले. स्व. जनार्दन भगत यांचा पुण्यतिथी कार्यक्रम शेलघर येथे झाला. या वेळी अनेक मान्यवरांनी शेलघर येथील निवासस्थानी भेट देऊन भगतसाहेबांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करीत अभिवादन केले.
या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अनिल भगत, तेजस कांडपिळे, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील, संजय भगत, प्रकाश भगत, पांडुशेठ घरत, वसंतशेठ पाटील, माजी पंचायत समितीच्या सदस्य रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत, न्हावे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हरेश्वर म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे, जयवंत देशमुख, जयंत भगत, विश्वनाथ कोळी, सुभाष भगत, योगिता भगत, सुहास भगत, सुधीर ठाकूर, अरुण ठाकूर, अनुप भगत, विजय भगत, समीर भगत, रामचंद्र म्हात्रे, कृष्णा गोवंडी, संध्या मुंबईकर, निर्मला गोंधळी, हरेश म्हात्रे, कमलाकर देशमुख यांच्यासह ग्रामस्थांनीही अभिवादन केले.
Check Also
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper