खारघर : रामप्रहर वृत्त
हावरे स्पेंडर सोसायटीने सोलर प्लांट बसवून खारघर परिसरामध्ये सौर ऊर्जेचे वापर करण्यासाठी एक आदर्श असे उदाहरण प्रस्थापित केले आहे. त्यांनी राबवलेला हा उपक्रम इतर गृहनिर्माण संस्थांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघरमध्ये सोलर प्लांटच्या उद्घाटनावेळी केले.
खारघर येथील हावरे स्प्लेंडर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीनेसोलर प्लांट प्रकल्प कार्यान्वित करून पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत ऊर्जा बचतीचा आणि पर्यावरणाचा समतोल साधला आहे. या सोलर प्लांटच्या उद्घाटन सोहळ्याला भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, उपाध्यक्ष किरण पाटील, अमर उपाध्याय, दिलीप जाधव, प्रवीण बेरा, शैलेंद्र त्रिपाठी, हावरे सोसायटीचे अध्यक्ष शिवम सिंग, सचिव विश्वंभर सिंह, कोषाध्यक्ष संजय जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
या वेळी सोसायटीचे अध्यक्ष शिवम सिंग यांनी सांगितले की, हा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे सोसायटीचा वीज खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. आम्ही स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करत आहोत. यामुळे केवळ आर्थिक बचतच होणार नाही, तर पर्यावरणाची काळजी घेण्यातही आमचे योगदान असेल,
असे सांगितले.
हावरे स्पेंडर सोसायटीने सोलर प्लांट बसवून खारघर परिसरामध्ये सौर ऊर्जेचे वापर करण्यासाठी एक आदर्श असे उदाहरण प्रस्थापित केले आहे. त्यांनी राबवलेला हा उपक्रम इतर गृहनिर्माण संस्थांसाठी प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन पनवेलचे आमदार प्रशांथ ठाकूर यांनी खारघरमध्ये सोलर प्लांटच्या उद्घानावेळी केले.
खारघर येथील हावरे स्प्लेंडर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीनेसोलर प्लांट प्रकल्प कार्यान्वित करून पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत ऊर्जा बचतीचा आणि पर्यावरणाचा समतोल साधला आहे.
या सोलर प्लांटच्या उद्घाटन सोहळ्याला भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, उपाध्यक्ष किरण पाटील, अमर उपाध्याय, दिलीप जाधव, प्रवीण बेरा, शैलेंद्र त्रिपाठी, हावरे सोसायटीचे अध्यक्ष शिवम सिंग, सचिव विश्वंभर सिंह, कोषाध्यक्ष संजय जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. या वेळी सोसायटीचे अध्यक्ष शिवम सिंग यांनी यावेळी सांगितले की, हा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे सोसायटीचा वीज खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. आम्ही स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करत आहोत. यामुळे केवळ आर्थिक बचतच होणार नाही, तर पर्यावरणाची काळजी घेण्यातही आमचे योगदान असेल,
असे सांगितले.
Check Also
कलावंतांच्या रखडलेल्या मानधनाचा प्रश्न विधिमंडळात
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाकडून सुधारणा व तातडीच्या कार्यवाहीचे आश्वासन मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील …
RamPrahar – The Panvel Daily Paper