Breaking News

शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी सर्वांची -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेलमध्ये दाखले वाटप शिबिर; लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे यांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
राज्य सरकाच्या योजना सर्वांपर्यत्त प्रभावीपणे पोहचवण्याची जबाबदारी फक्त सरकारची नसून ज्यांना या योजनांचा लाभ मिळतोय त्यांचीही ही जबाबदारी आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या माध्यमातून या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यत्त पोहचल्या पाहिजेत असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या दाखले वाटप शिबीरावेळी केली. तसेच या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देऊन दाखले वाटप कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयोजक डॉ. विलास मोहकर आणि डॉक्टर सुरेखा मोहकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या वयाच्या 75 वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त संपुर्ण वर्षभरात अमृत महोत्साव साजरा करण्यात येणार असून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्यापार्श्वभुमीवर पनवेल भारतीय जनता पार्टी आणि जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यामतून शासकीय दाखले शिबिर, आधार कार्ड आणि आयुष्यमान भारत योजने अंतर्गत 5 लाखांपर्यत्त विमा कार्ड शिबीराचे आयोजन डॉक्टर विकास मोहोकर आणि माजी नगरसेविका डॉक्टर सुरेखा मोहोकर यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. हे शिबीर पनवेल शहरातील परदेशी आळीमध्ये आयोजीत करण्यात आले असून यात आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आयोग योजना, महात्मा ज्योतीराव आरोग्य योजना तसेच उत्पन्न, नॉन उत्पन्न प्रमाणपत्र, डोमेसाईल, नवीन आधारकार्ड, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर, ज्येष्ठ नागरीक प्रमाणपत्र, स्थानिक वास्तव्याचा प्रमाणपत्र तसेच इडब्ल्यूएस प्रमाणपत्र वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीराचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्याहस्ते झाले. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठनेते जे.एम.म्हात्रे, लोकनेते दि.बा.पाटील यांचे सुपूत्र अतुल पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, पनवले महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, माजी नगरसेवक गणेश कडू, गणेश पाटील, अजय बहिरा, सुनिल बहिरा, माजी नगरसेविका सुरेखा मोहोकर, राजश्री वावेकर, वृषाली वाघमारे, प्रिती जॉर्ज, अनुराधा ठोकल, सारीका भगत, भाजपचे पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव, शहर सरचिटणीस अमित ओझे, डॉक्टर विलास मोहोकर, संजय मोहोकर, विजय मोहोकर, पुष्पलता मढवी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या शिबीराचा लाभ अनेक नागरीकांनी घेतला.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply