केदार भगत मित्र परिवारातर्फे शिधा वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल शहर भाजपचे उपाध्यक्ष केदार भगत आणि केदार भगत मित्र परिवार यांच्यावतीने लक्ष्मी वसाहतीमध्ये गरीब गरजूंना ’दादांचा शिधा’ याचे वाटप करण्यात आले.
या वेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी उपस्थित राहून दादाच्या शिधाचे वाटप करून सांगितले की, आमदार प्रशांत ठाकूर यांनी सामाजिक उपक्रम राबवण्याची संकल्पना मांडून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले आहे. त्यानुसारच पनवेल परिसरात आठवडाभर विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. कोरोना काळात भाजपने नागरिकांना मोफत अन्नदान केले होते.
कार्यक्रमावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, माजी शहर अध्यक्ष अनिल भगत, गणेश कडू, शहराध्यक्ष सुमित झुंजारराव, सचिव अमित ओझे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे-समेळ, प्रिती जॉर्ज, शहर उपाध्यक्ष प्रितम म्हात्रे, पवन सोनी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक आयोजक केदार भगत यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत मंजुळे, राजू कोळी, संतोष ढगे, रोशन जाधव, उमेश मंजुळे, मनीष निपाणीकर, अब्दुल पटेल, विकास मंजुळे, लखन जाधव, संतोष वर्तले, भावेश शिंदे आदींनी प्रयत्न केले.
धाकटा खांदा येथे गुणगौरव आणि छत्री वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त
रत्नदीप स्पोर्ट्स क्लबच्या वतीने धाकटा खांदा येथील श्री गणेश विद्या मंदिर प्राथमिक शाळेत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी (दि.5)करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून ज्येष्ठ नागिरकांना छत्र्यांचे वाटप केले. या वेळी ते म्हणाले की विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आजचे विद्यार्थी हेच उद्याचे भविष्य आहेत. त्याचबरोबर, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे. रत्नदीप स्पोर्ट्स क्लबने आयोजित केलेला हा कार्यक्रम समाजातील दोन्ही महत्त्वाच्या घटकांना सन्मानित करणारा आहे.
या कार्यक्रमास माजी महापौर कविता चौतमोल, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अनिल भगत, एकनाथ गायकवाड, महेंद्र कावळे, नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, सुरेखा मोहोकर, सारिका भगत, अलका भगत, अमरीश मोकल, उज्वला पाटील, गणेश म्हात्रे, भाजप नेते भीमराव पोवार, मोतीलाल कोळी, युवा मोर्चाचे अभिषेक भोपी, नितेश घुगे आदी उपस्थित होते.
ज्योत्स्ना भरडा (राज्य उपाध्यक्षा महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघ) यांच्याकडून माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त 100 चित्रकला वह्या व 200 गोष्टींची पुस्तके शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता माजी नगरसेवक मनोहर जानू म्हात्रे यांनी केली आणि उपस्थित मान्यवरांना धन्यवाद देऊन आभार मानले. दरम्यान, नेहा वैजयंता सुनील पवार बारावी कॉमर्समध्ये 94.33 टक्के गुण मिळाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.
रोहिदासवाडा येथे स्वच्छता मोहीम
पनवेल : रामप्रहर वृत्त
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपुलकी फाउंडेशन आणि भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक 19 यांच्या वतीने रोहिदासवाडा येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत रोहिदासवाडा येथील समाज मंदिर आणि बालवाडी परिसर स्वच्छ करण्यात आला.
या वेळी पनवेल महापालिकेेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले की, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छता मोहीम हा त्यापैकीच एक महत्त्वाचा उपक्रम आहे, जो समाजाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देतो.
स्वच्छता मोहिमेत माजी नगरसेवक अनिल भगत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सुलोचना कल्याणकर, नीलिमा शेलार, सिद्दीकी पुंजानी, मंदाताई भगत, प्रभाग अध्यक्ष पवन सोनी, आपुलकी फाउंडेशनचे अध्यक्ष संजय जाधव, प्रवीण मोहोकर, बाब्या जाधव, रजनीश जाधव, मधुकर उरणकर, निर्मला वैती, शांताराम कल्याणकर, रोहित भगत, गोरख नवले यांच्यासह पनवेल महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक आणि स्वच्छतादूत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खारघरमधील मुर्बी येथे वृक्षारोपण आणि अन्नदान
खारघर : रामप्रहर वृत्त
पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गावदेवी मंदिर खारघर सेक्टर 19 मुर्बी येथील या ठिकाणी मंगळवारी सकाळी वृक्षारोपण कार्यक्रम व जीवन ज्योती आश्रम येथे दुपारी अन्नदानाचे आयोजन पनवेल महानगरपालिका माजी नगरसेवक अभिमन्यू धर्मा पाटील व भाजप खारघर शहर युवा मोर्चा अध्यक्ष नितेश अभिमन्यू पाटील यांच्यामार्फत करण्यात आले होते.
या वेळी कार्यक्रमास भाजप उत्तर रायगड जिल्हा सचिव ब्रिजेश पटेल, खारघर मंडल उपाध्यक्ष किरण पाटील, प्रभाग 4 अध्यक्ष श्री वासुदेव पाटील, खारघर मंडल सरचिटणीस दिपक शिंदे, उत्तर भारतीय मोर्चा उत्तर रायगड संतोष शर्मा, महिला मोर्चा अध्यक्षा साधना पवार, अजय माळी, अमित बोधाई, स्नेहल बोधाई, निलम विस्पूते, अनिता जाधव, स्मिता आचार्या, विद्या येवले, रजनी शर्मा श्रीकांत पाटील कैलाश बुवा पाटील, भगवान बडगुजर, युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रवीण बेरा, सचिव आदित्य हातगे, प्रथम पाटील, दीपक ठाकूर, ध्रुव गजरा, मंगेश पाटील, सोमनाथ पाटील ,जयेंद्र पाटील,दिनेश कडू, निरंजन पाटील, आदेश पाटील, मुकेश कडू, सागर कोळी, शेखर कोळी, हृतिक पाटील, प्रतीक पाटील, शरद करावकर, बंटी ढाकसे आदी उपस्थित होते.
तक्का येथील शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या माध्यमातून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तक्का येथील मराठी शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य दृष्टिकोनातून हे शिबिर आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले.
या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, सुनील बहिरा, अमरीश मोकल, संदीप बहिरा,प्रतिक बहिरा, तुकाराम बहिरा, राम सरग, जितू खुटकर, आफताब ताडे, महेश रावळ, नितेश बहिरा, संतोष अपशिंगे, उमेश अधिक, ब्रिजेश बहिरा, भरत बहिरा, अतुल बहिरा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन अजय तुकाराम बहिरा मित्र मंडळ, प्रभाग क्रमांक आणि तक्का ग्रामस्थ मंडळाने केला होता.
पोदी येथील प्राथमिक शाळेत कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त साईतेज प्रतिष्ठान आणि आयरिस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मधील पोदी येथील प्राथमिक शाळेत मंगळवारी आरोग्य तपासणी शिबिराचे तसेच माजी नगरसेवक तेजस कांडपिळे यांच्यावतीने स्कूल बॅगचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या कार्यक्रमाला भेट देऊन पाहणी केली. तसेच उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, माजी नगरसेवक अनिल भगत, पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव, माजी नगरसेवक तेजस कांडपीळे, अमरशी मोकल, जयराम मुंबईकर, जयेश ठाकूर, समीर मोरे, पराग कार्ले, निता घाटुगडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
सोसायट्यांमध्ये स्वच्छता मोहीम
पनवेल : आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी नगरसेविका सुशिला जगदीश घरत व डॉ. अस्मिता जगदीश घरत यांच्यामार्फत नवीन पनवेल सेक्टर 14मधील श्री वरदविनायक घरमालक सोसायटी, सह्याद्री गृहनिर्माण सोसायटी व ओम अपार्टमेंट अशा तीन सोसायट्यांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तीनही सोसायट्यांमधील आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून आमदार प्रशांत ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
सावळे येथे वह्यांचे वाटप
पनवेल : आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजिप शाळा सावळे येथे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या मार्फत वह्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास ज्येष्ठ कार्यकर्ते सदाशिव माळी, मारुती माळी, गुळसुंदे जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गाताडे, माजी सरपंच सुनील माळी, तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष रामचंद्र केदारी, युवा उद्योजक राम गाताडे, लक्ष्मण गाताडे, जयवंत म्हात्रे, शांताराम कांबळे, रघुनाथ माळी, नयन भंडारकर, शिक्षक शिंदे आदी उपस्थित होते
RamPrahar – The Panvel Daily Paper