Breaking News

भाजपतर्फे नवीन पनवेलमध्ये तिरंगा पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्त
स्वातंत्र्य दिनाचे औचित्यसाधून भारतीय जनता पक्षाच्या माध्यामतून संपूर्ण देसभरात तिरंगा पदयात्रेचे आयोजन करून राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात येत आहे. त्यापार्श्वभुमीवर भाजप नवीन पनवेल मंडळाच्या वतीने बुधवारी (दि.13) तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, भाजप नेते बाळासाहेब पाटील आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
खांदा कॉलनीमधील एक्सिस बँक येथून सुरुवात झाली. पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवीन पनवेल ब्रीज, तुलशी हाईट, द्वारका स्वीट, अंबे माता मैदान असे मार्गक्रमण करत शिवा काम्प्लेक्सजवळ सांगता झाली. या पदयात्रेत नागरीकांनी तिरंगा हातात घेऊन भारतमातेच्या जयघोष केला.
या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, जिल्ह सरचिटणीस प्रकाश बिनेदार, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर सीतातार्ई पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, एकनाथ गायकवाड, मनोहर म्हात्रे, समीर ठाकूर, तेजस कांडपिळे, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, वृषाली वाघमारे, सुशीला घरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, भिमराव पोवार, किशोर चौतमोल, जगदीश घरत, अभिषेक भोपी, देवराम शार्दुल, वरुन डांगर, विवेक होन, मयुर कदम, अक्षय सिंग यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक उपस्थित होते.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply