पनवेल : रामप्रहर वृत्त
सेवा पंधरवडा अंतर्गत स्वच्छता सेवा अभियान सर्वत्र राबवण्यात येत आहे. त्यानुसार तक्का येथे बुधवारी (दि.17) स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. या अभियानात आमदार प्रशांत ठाकूर यांनी
सहभाग घेतला.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान सेवा पंधरवडा राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत तक्का येथील गोदरेज, कॅम्प येथील स्काय गार्डन परिसरात भव्य स्वच्छता अभियान बुधवारी राबविण्यात आले. या अभियानात आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी एकत्रित येत परिसराची स्वच्छता करून सामाजिक बांधिलकी जपली.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जयंत पगडे, रघुनाथ बहिरा, माजी नगरसेवक अजय बहिरा, प्रभाकर बहिरा, सुनील बहिरा, पनवेल शहराध्यक्ष सुमित झुंजारराव, युवा नेते प्रतिक बहिरा, कल्पना पाटील, बाळाराम चिखलेकर, विशाल म्हसकर, सचिन चिखलेकर, जगदिश परदेशी, रूपेश परदेशी, महेश राऊळ, जितु खुटकर, संतोष आपशिंगे, आफताब ताडे, विनायक बहिरा, भारत बहिरा, स्वच्छता निरीक्षक अरुण कांबळे, अभिजित भंवर यांच्यासह पालिका कर्मचारी, गोदरेज स्काय गार्डनचे फेडरेशन सर्व चेअरमन, सेक्रेटरी आणि सदस्य उपस्थित होते.
Check Also
रक्तसाठा अद्ययावत माहितीच्या मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष
रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत न करणाऱ्या रक्तकेंद्रांवर दंडात्मक कारवाई -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई : रामप्रहर …
RamPrahar – The Panvel Daily Paper