पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात सर्वप्रथम 10 नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या अनुषंगाने राज्याचे मंत्री तथा भाजपचे रायगड संपर्क प्रमुख आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये उत्तर आणि दक्षिण रायगड भाजपच्या कोअर कमिटीची बैठक शनिवारी (दि. 8) पनवेल मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झाली.
या बैठकीला भाजप रायगड निवडणूक प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर, दक्षिण रायगड निवडणूक प्रमुख सतीश धारप, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, अॅड. प्रकाश बिनेदार, आस्वाद पाटील, दीपक बेहेरे, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, अॅड. महेश मोहिते, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे आदी उपस्थित होते.
या वेळी नगरपालिका निवडणुकांसंदर्भात मंत्री आशिष शेलार यांनी मार्गदर्शन व सूचना केल्या तसेच तयारीचा आढावा घेतला. रायगडचे निवडणूक प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर यांनी, प्रबळरित्या ही निवडणूक लढवली पाहिजे या दृष्टिकोनातून पूर्ण भाजपची तयारी आहे तसेच जिथे जिथे शक्य असेल तिथे महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाऊ, असे प्रतिपादन केले.
‘भाजप महायुती सज्ज’
राज्याचे मंत्री तथा भाजपचे रायगड संपर्क प्रमुख आशिष शेलार यांनी रायगड जिल्ह्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या तयारीबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली. रायगडचे निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर तसेच उत्तर आणि दक्षिण जिल्हाध्यक्ष व कोअर कमिटीसोबत संघटनात्मक चर्चेचा सविस्तर आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले. महायुती हाच आमचा ठाम पवित्रा असून विरोधी पक्षाला फायदा होणार नाही अशा पद्धतीने काही रचना आणि व्यवस्था करावी लागली, तर आम्ही त्यासाठीही खुले आहोत, असे मंत्री शेलार यांनी स्पष्ट केले.
राज्यभरात एकाच वेळी होणार्या निवडणुकांसाठी संघटनेची पडताळणी, फॉलोअप आणि फीडबॅकची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रणाली कार्यरत असून निवडणूक व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या कार्यशाळाही नुकत्याच घेण्यात आल्या.
उमेदवारांच्या नावांच्या निवड प्रक्रियेची कार्यपद्धती पक्षातील पदाधिकार्यांना स्पष्ट करण्यात आली आहे. आता सर्व स्तरांवर महायुतीमधील मित्रपक्षांशी चर्चा, उमेदवारांची पडताळणी, प्रचार साहित्य, जाहीरनाम्यांची तयारी आणि प्रचाराच्या योजनांना वेग मिळणार आहे. या सर्व घटकांवर अंतिम निर्णय घेण्यासाठी 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक होणार असल्याचेही मंत्री शेलार यांनी सांगितले.
Check Also
उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!
पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …
RamPrahar – The Panvel Daily Paper