Breaking News

पनवेल महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या आरक्षण निश्चितीसाठी मंगळवारी (दि. 11) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोडतीचे आयोजन करण्यात आले होते. या सोडतीद्वारे एकूण 20 प्रभागांतील अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.
आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सोडतीस अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, महेशकुमार मेघमाळे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, नानासाहेब कामठे, प्रसेनजित कारलेकर, वैभव विधाते, सचिव अक्षय कदम, कार्यकारी अभियंता सुधीर साळुंखे, आरेखक नितीन हुद्दार, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर तसेच माजी नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
प्रारूप आरक्षणावर विहीत नमुन्यात हरकती व सूचना मागविण्यासाठी 17 नोव्हेंबरपर्यंत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हरकती व सूचना मागविण्याची अंतिम तारीख 24 नोव्हेंबर असणार आहे तसेच 2 डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply