Breaking News

पनवेल महापालिकेच्या शाळांना हॅपीनेस किटचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

अक्षयपात्र फाऊंडेशन ही संस्था देशात सरकारी आणि काही खासगी शाळांना मध्यान्ह भोजन पुरविते. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेच्या गुरुवारी (दि. 3) प्राथमिक शाळा क्र. 1 सरस्वती विद्यामंदिर शाळेत तर शुक्रवारी (दि. 4) प्राथमिक शाळा क्र. 9 गुजराती शाळेत हॅपीनेस किटचे वाटप करण्यात आले. संस्थेकडून शाळेतील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना व विद्यार्थ्यांच्या पालकांना हॅपीनेस किटचे वाटप नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते करण्यात आले.या हॅपीनेस किटमध्ये जीवनावश्यक धान्य, कडधान्य यांचा समावेश आहे. यात मूग दोन किलो, शेंगदाणा 500 ग्रॅम, तुरडाळ एक किलो, हरभरा 500 ग्रॅम, मसाला 100 ग्रॅम, हळद 100 ग्रॅम, साखर एक किलो, दालचिनी 50 ग्रॅम, मीठ एक किलो, गव्हाचे पीठ दोन किलो, साबण एक नग, टुथपेस्ट आणि ब्रश एक किट, वही एक नग, पेन दोन नग अशाप्रकारे साहित्यांचा समावेश आहे. किटच्या वाटपानंतर शाळेकडून मान्यवरांचे आणि संस्थेचे आभार मानण्यात आले. या वेळी सरस्वती विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक वाल्मिक राठोड, गुजराती शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली त्रिवेदी आणि शिक्षक वृंद या वेळी उपस्थित होता.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply