पनवेल : रामप्रहर वृत्त
सिडकोचा अनेक ठिकाणचा विकास हा फक्त कागदावर होता, मात्र पनवेल महापालिके स्थापन झाल्यानंतर तो विकास प्रत्यक्षात उतरतोय आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण सर्व जण हा विकास वेगाने व्हावा यासाठी काम करत आहोत, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठे येथे दैनिक बाजारांच्या भूमिपूजनावेळी केले. तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते हेच खर्या अर्थाने विकासाचे शिल्पकार आहेत गौरवोद्गार काढले.
पनवेल महापालीकेच्या वतीने कामोठेमध्ये पाच ठिकाणी दैनिक बाजार उभारण्यात येणार आहे. महापालिकेच्या आठ कोटी 84 लाख सहा हजार 483 रुपयांच्या निधीमधून हे काम होणार आहे. हे काम मार्गी लागण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदशनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने पाठपुरावा केला होता. त्यानुसार हे काम मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजन माजी नगरसेवक दिलीप पाटील यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत सोमवारी झाले.
या वेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर, कामोठे मंडळ अध्यक्ष विकास घरत, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, दिलीप पाटील, कुसुम म्हात्रे, हेमलता गोवारी, जिल्हा चिटणीस विद्या तामखेडे, कामोठे मंडळ सरचिटणीस हर्षवर्धन पाटील, भाजप नेते प्रदीप भगत, राजेश गायकर, रवी गोवारी, भाऊ भगत, पल्लवी पाटील, सुरेखा लांडे, वर्षा शेलार, जैनकुमार डिंगोरे, मयूर मोहिते, संतोष म्हात्रे, चंद्रकांत कडू, सुरेश खरात, मनोहर शिंगाडे, तुलसा घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …
RamPrahar – The Panvel Daily Paper