पनवेल ः रामप्रहर वृत्त
शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा एकदा धक्का बसला असून पडघे येथील शेकापचे पनवेल महानगर जिल्हा सहसचिव आणि माजी सरपंच नकुल जोशी यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी जोशी यांना भाजपची शाल देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले. भाजपच्या पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात बुधवारी (दि. 3) झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, पनवेल तालुका उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, प्रभाग 2चे अध्यक्ष कृष्णाशेठ पाटील, नारायणशेठ पाटील, महेश पाटील, वासुदेव पाटील, राम पाटील, गजानन पाटील, आशिष कडू, पवन भोईर, किरण दाबणे, शशिकांत गोंधळी, कैलास भोईर, नामदेव भोईर, रघुनाथ भोईर, विद्यानंद पाटील, महेश भोईर, विजय कांबळे, श्रीनाथ पाटील, सागर भोईर, रतन जोशी, अमित पाटील, अलंकार पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट
चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …
RamPrahar – The Panvel Daily Paper