पनवेल : रामप्रहर वृत्त
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी केलेले कार्य अतुलनीय असे आहे, असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 6) महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करताना काढले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पनवेल शहरातील पुतळ्याला आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्यासह इतर मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, अॅड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी नगरसेवक अनिल भगत, शिवदास कांबळे, संतोष भोईर, अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्टे, माजी जि.प. सदस्य अमित जाधव, पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, प्रकाश खैरे, अकबर सय्यद, प्रितम म्हात्रे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. सर्वांनी अभिवादन करून डॉ. आंबेडकरांच्या कार्याचे स्मरण केले.
Check Also
भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …
RamPrahar – The Panvel Daily Paper