Breaking News

पंतप्रधान मोदी प्रत्येक घटकाचा विचार करतात -प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

पनवेल : रामप्रहर वृत्त
देशातील प्रत्येकाचे जीवन सुखमय झाले पाहिजे, या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत. एक माता जशी तिच्या कुटुंबाचा विचार करते, त्याचप्रमाणे कुटुंबप्रमुख म्हणून देशाचे पंतप्रधान प्रत्येक घटकाचा विचार करतात, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी पनवेलमध्ये यंत्रसामुग्री वाटपावेळी केले.
पनवेल विधानसभा मतदारसंघातील महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नांतून प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत घरघंटी व शिलाई मशीन वाटपाच्या योजनेचा शुभारंभ झाला आहे. या उपक्रमांतर्गत सोमवारी (दि.15) भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत घरघंटी व शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या आवारात हा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, वाय.टी. देशमुख, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, ‘दिबां’चे चिरंजीव अतुल पाटील, कळंबोली शहराध्यक्ष अमर पाटील, पनवेल शहराध्यक्ष सुमित झुंजारराव, उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, राजेंद्र शर्मा, बबन मुकादम, मुकीत काझी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, प्रमिला पाटील, राजश्री वावेकर, वृषाली वाघमारे, मोनिका महानवर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रिया मुकादम, संजय भगत, मयुरेश नेतकर, बबन बारगजे, सतीश पाटील, राजेश गायकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह माजी नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply