पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल मतदार संघातील नागरिकांना सुविधा पुरवण्यात आमदार प्रशांत ठाकूर यांचे मोठे योगदान आहे. असे प्रतिपादन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांनी रविवारी नेरे महालक्ष्मी नगर येथे रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्यावेळी केले.
नेरे येथील महालक्ष्मीनगरमधील अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमधून 20 लाख रुपये खर्च करून हे काम करण्यात आले होते. या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामासाठी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांनी हे महत्त्वाचे काम पूर्णत्वास गेले आहे.
या लोकार्पण सोहळ्याला भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरपंच प्रकाश घाडगे, उपसरपंच राम पाटील, देवदास पिसाळ, दिनेश मानकामे, राजाराम खंडागळे, दिनेश जाधव, माजी उपसरपंच वंदना रोडपालकर, निलीमा पाटील, कल्पना वाघे, महालक्ष्मीनगर असोसिएशनचे चेअरमन जितेंद्र कुमार, अध्यक्ष नितीन कानिटकर, संतोष फुटाणे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
अफवांच्या पिकाला सत्याच्या विचारांनी छेद द्या; सोशल मीडियावर सक्रिय अन् बोलके राहा!
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तआजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात …
RamPrahar – The Panvel Daily Paper