वर्षा सहलीस येणार्यांवर होणार कारवाई

पनवेल : वार्ताहर

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. या विषाणूचा फैलाव शहरी भागासह ग्रामीण भागात होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण आदी ठिकाणावरुन वर्षासहलीस पनवेल परिसरात येणार्‍या पर्यटकांवर आता पोलीस कारवाई करणार आहेत.

पावसाळ्यात धरण क्षेत्रात येणार्‍या पर्यटकांना मज्जाव घालण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. त्यानुसार तालुक्यातील गाढेश्वर, मोरबे धरण आणि माचीप्रबलच्या मार्गावर पोलीस बंदोबस्तात वाढ केली जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पावसाला सुरूवात झाल्याने पनवेल तालुक्यातील धरण पर्यटकांना खुणावत आहेत. दरवर्षी मोठ्याप्रमाणात पर्यटक या ठिकाणी येतात. पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक अपघात होतात. परिणामी पोलीस यंत्रणेची तारांबळ उडते. पोलीस सर्वांना सावधानतेचा इशारा देतात मात्र याकडे काही पर्यटक कानाडोळा करतात. परंतु यावर्षी कोरोना संसर्गामुळे पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. धरणाकडे जाणार्‍या प्रत्येक मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला जाणार आहे.

सध्या देशभरात कोरोनाचे सावट आहे. या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पोलीस काळजी घेत आहेत. पावसाळ्यात पर्यटकांना मज्जाव करण्यासाठी गाढेश्वर, शांतीवन, नेरे, हरिग्राम, माची प्रबळ, कर्नाळा परिसर, कुंडी धबधबा परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Check Also

Vor die eine Auszahlung denkbar sei, in kraft sein halb wahrscheinlich Umsatzbedingungen

Bares unter anderem Bonusgewinne In welchem ausma? diese Gewinne schenke & amyotrophic lateral sclerosis Bonusgeld …

Leave a Reply