Thursday , March 23 2023
Breaking News

वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत; चौघांविरोधात गुन्हा दाखल

पनवेल : बातमीदार : आदई सर्कल, नवीन पनवेल येथे ब्रेथ अनालायझर मशीन मध्ये फुंकर मारण्यास नकार देऊन वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घालणार्‍या चौघांविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सुनील रामेश्वर सोनी (29, सुकापूर) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आदई सर्कल येथे वाहतूक शाखेचे किरण सोनावणे (33) हे ड्रंक एंड ड्राईव्हची कारवाई करत होते. यावेळी मोटार सायकल क्रमांक एमएच 46 एयु 6361 वरील सुनील सोनी व किशोर शर्मा यांना ब्रेथ अनालायझर मशीन मध्ये फुंकर मारण्यास सांगितले असता त्यांनी त्यास नकार दिला.  व होळी असल्याने मी दारू प्यायलो आहे, तुम्ही कशाला कारवाई करता असे सांगून हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तसेच किशोर शर्मा याने शिवीगाळ करून तुम्हाला कामाला लावतो अशी धमकी दिली. यावेळी अमिता पांडे व आणखी एका इसमाने पोलिसांना धक्काबुक्की करून आरडा ओरड केली.  यावेळी अमिता पांडे व आणखी एक इसम गर्दीचा फायदा घेऊन पळून गेली आहे. खांदेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तरुणीचा विनयभंग, आरोपीला अटक

तालुक्यातील एका गावामध्ये 18 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी तालुका पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.     पिडीत 18 वर्षीय तरुणीचा आरोपीने पाठलाग केला व मोटार सायकल वर येऊन गाडी तिच्या आडवी लावली व मी तुझ्यावर प्रेम करतो, तू मला आवडते, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे बोलून तू जर नकार दिला तर तुझे लग्न दुसरीकडे जमू देणार नाही असे पिडीतेला बोलला व तिच्यासोबत असलेला फोटो वोटसअप स्टेट्स वर ठेऊन तिची बदनामी केली. तालुका पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

तळोजात मद्य जप्त

तालुक्यातील वलप येथे मद्य विक्री करणार्‍या महिलेविरोधात तळोजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मी अरूण साखरे असे या महिलेचे नाव आहे. लक्ष्मी साखरे ही महिला अवैधरित्या देशी दारू व गावठी दारूची विक्री करत असल्याबाबत तळोजा पोलिसांना माहिती मिळाली होती. माहितीच्या अनुषंगाने बेल नाका जवळील आयजीपीएल कडुन येणा-या रोड लगत असलेल्या एका पडीक झोपडी जवळ पोलीस पायी चालत गेले असता या ठिकाणी एक महिला आपले पुढयात दोन पांढ-या रंगाचे कन व पांढ-या रंगाच्या तीन प्लास्टिकच्या गोण्या ठेवलेल्या अवस्थेत बसलेली पोलिसांना दिसली. तीला पोलिसांची चाहुल लागल्याने ती न थांबता आंधाराचा फायदा घेवुन पळुन गेली. पोलिसांनी 11 हजार 224 रुपयांची दारू जप्त केली आहे.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply