Breaking News

ऋषितुल्य व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

पनवेल : प्रतिनिधी

निस्वार्थीपणे समाजाची सेवा करणारे तसेच कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कतिक, राजकीय क्षेत्रात आदर्श असणारे व आपल्या कार्याने सर्व समाजाला प्रेरणा देणारे बहुजनांचे दाते, गरिबांचे कैवारी आणि सकलजनांचा आधार व ऋषितुल्य व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 68 व्या वाढदिवसानिमित्त रविवार, 02 जून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, तसेच हजारो कार्यकर्त्यांनी अभीष्टचिंतन करून त्यांना निरोगी दीर्षायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन अभीष्टचिंतन केले. यावेळी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.  तसेच राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शुभेच्छापत्र पाठवून अभीष्टचिंतन केले.

त्याचबरोबर माजी मंत्री रविशेठ पाटील, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, माजी आमदार देवेंद्र साटम, महापौर डॉ. कविता चौतमोल, पनवेलचे प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले, महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, आरपीआयचे कोकण प्रांताध्यक्ष जगदीश गायकवाड, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, सिडकोचे माजी संचालक वसंत भोईर, काँग्रेस नेते डॉ. भक्तीकुमार दवे, रयत शिक्षण संस्थेचे सचिव भाऊसाहेब कराळे, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिरीष घरत, जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील,  पनवेल विधानसभा संघटक दीपक निकम, प्रकल्पग्रस्तांचे नेते स्व. दि. बा. पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील, उपमहापौर विक्रांत पाटील, यांच्यासह जिल्ह्यातील विविध पक्षातील नेते-पदाधिकारी, विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, सदस्य, कार्यकर्ते आणि हजारो नागरिकांनी त्यांचे अभीष्टचिंतन केले.

वाढदिवसानिमित्त 10 जूनपर्यंत महास्वच्छता अभियान महापालिका हद्दीत होणार आहे. तसेच शनिवार दिनांक 08 जून रोजी खांदा कॉलनी मधील सीकेटी महाविद्यालयात शिक्षित-अशिक्षितांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, त्याचबरोबर ’चला रंगवुया पनवेल’ या शिर्षकाखाली दिनांक 4 ते 14 जून पर्यंत सुंदर माझी भिंत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच हितचिंतकांकडून विविध समाजोपययोगी उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply