Breaking News

मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर

26 सप्टेंबरला पनवेलमध्ये अंतिम फेरी

नवेल ः रामप्रहर वृत्त
अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धेच्या
प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला असून अंतिम फेरी रविवारी (दि. 26) पनवेलमध्ये होणार आहे.  
अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष तथा महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. मराठी भाषेत आयोजिलेली ही स्पर्धा दोन फेर्‍यांमध्ये होत असून प्राथमिक फेरी ऑनलाईन पद्धतीने झाली. यामध्ये 100 जणांनी सहभाग घेतला. प्राथमिक फेरीचे परीक्षक म्हणून दिग्दर्शक, अभिनेते दीपक पवार आणि नकलाकार, अभिनेते श्रीनिवास लखपती यांनी काम पाहिले. प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी ऑफलाईन स्वरूपात पनवेलमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात होईल.  राज्यस्तरीय मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धेतील प्रथम क्रमांकास 10 हजार रुपये, द्वितीय सात हजार, तृतीय क्रमांकास तीन हजार रुपये व उत्तेजनार्थ एकूण दोन पारितोषिके, तर रायगड जिल्हास्तरीय अभिनय स्पर्धेतील प्रथम क्रमांकास पाच हजार, द्वितीय तीन हजार, तृतीय क्रमांकास दोन हजार रुपये व उत्तेजनार्थ एकूण दोन पारितोषिके असणार आहेत.  
राज्यस्तरीय प्राथमिक फेरी निकाल
प्रथमेश दिग्रजकर (नागपूर), मृणालिनी वानखेडे (ऐरोली), अजिंक्य टेकले (अंधेरी), गुरुप्रसाद गंगा (मुंबई), ज्योती उरणकर (पनवेल), कोमल वंजारे (कांदिवली), महेंद्र गोंदणे (भंडारा), मानसी पवार (घाटकोपर), निकिता झेपले (विलेपार्ले), ऋतिका चाळके (दादर), आसावरी येवले (दादर), गायत्री नाईक (वसई), हनुमंत शिंदे (सातारा), परेश राजश्री (मुंबई), सावनी देशपांडे (सोलापूर), हर्षदा वाघ (पुणे), अतुल शिर्के (रत्नागिरी), साक्षी देशपांडे (ठाणे), सिद्दी पारकर (विलेपार्ले), सुमित सावंत (दिवा), तृप्ती माळढोणकर (ठाणे), उमेश कांबळे (वसई), युवराज ताम्हणकर (पुणे), अमोघ देवस्थी (डोंबिवली).
रायगड जिल्हास्तरीय प्राथमिक फेरी निकाल
स्नेहल नरवडे (खांदा कॉलनी), उमेश वाळके (उसर्ली, पनवेल), प्रतीकेश मोरे (पळस्पे), ऋतुजा भगत (पनवेल), शर्मली केळकर (पनवेल), तेजश्री येरवळकर (नवीन पनवेल), अनिकेत गाडे (खांदा कॉलनी), जुई रानडे (पनवेल), कौस्तुभ सोमण (पनवेल), मुग्धा दातार (पनवेल), नील जाधव (सुकापूर), नितेश मानकामे (आदई), परीन मोरे (नवीन पनवेल), प्रीती मोरे (नवीन पनवेल), श्रीश म्हात्रे (उरण), श्वेता कुलकर्णी (नवीन पनवेल).

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply