Breaking News

राधाकृष्ण विखेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला

मुंबई : काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अखेर राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. येत्या 10 किंवा 11 जून रोजी विखे-पाटील भाजपात प्रवेश करणार आहेत. मात्र यावेळी ते एकटेच भाजपमध्ये प्रवेश करतील असे सूत्रांनी सांगितले. रिाधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करणार्‍या बंडखोर आमदारांना जागावाटपात स्थान मिळणार का आणि शिवसेना त्यांना जागा सोडणार का हा प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहे. भाजपकडूनही अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.

राधाकृष्ण विखे आमच्या दिशेने निघालेत. पोहोचले की घेऊन टाकू अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी विखे पाटलांवर भाष्य केलं. आमच्या पक्षात येण्यासाठी पदाचे आश्वासन आम्ही कोणालाही देणार नाही. जो येईल त्याचं स्वागत करू असं म्हणत विखेंना कोणती जबाबदारी दिली जाईल याबाबत त्यांनी मौन बाळगले.भाजप हा पक्ष खूप मोठा आहे. यात कर्नाटकचे मुख्यमंत्रीही आले आहेत. त्यांनाही पक्षाने सामावून घेतलं आहे, असे दानवे पुढे म्हणाले.

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेत आमदारकीचा राजीनामा दिला. विखेंनी यापूर्वीच विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचाही राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर विखेंनी गिरीश महाजन यांची भेट घेतली. तसेच मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचेही विखेंनी सांगितलं. यावेळी बोलताना आपल्यासोबत कुणीही आमदार येणार नसल्याचे विखेंनी स्पष्ट केलं. तसंच सर्व आमदार त्यांचा निर्णय घेण्यास सक्षम असल्याचं सूचक विधानही त्यांनी केलं आहे.

भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील दिल्लीत दाखल झाले आहेत. राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजपमध्ये होत असलेलं इनकमिंग, मंत्रिमंडळ विस्तार, नवे प्रदेशाध्यक्ष, मुंबई भाजप अध्यक्ष यांच्या निवडीबद्दल राज्यात चर्चा सुरु आहे.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply