Breaking News

जिल्ह्यात सात गोवर्धन गोंवश केंद्र मंजूर ; इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागविले

पनवेल : प्रतिनिधी

केंद्र शासनाने रायगड जिल्ह्यामध्ये सात गोवर्धन गोवंश सेवा केंद्र मंजूर झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील सात उपविभागांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे हे केंद्र मंजूर असून हे केंद्र चालवून गोसंवर्धनाचे काम करू इच्छिणार्‍या संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

या संदर्भात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे की, सन 2019-20 साठी अलिबाग, पनवेल, माणगाव, महाड, पेण, रोहा, श्रीवर्धन या महसुली विभागात ही केंद्र मंजूर झाली आहेत. केंद्र शासनाने विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणार्‍या संस्थांची निवड या गोवर्धन गोवंश सेवा केंद्रांसाठी केली जाणार आहे. त्यासाठी इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. प्राथमिक पडताळणी छाननी करून हे प्रस्ताव आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य औैंध पुणे यांच्याकडे सादर करावयाचे आहेत. याकरिता शासनाने कालबद्ध कार्यक्रम ठरवून वेळापत्रक निश्चित केले आहे.

अनुदानासाठी संबधित जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्याकडे अर्ज व इतर अनुषंगिक माहिती सादर करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे. संबधित जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी प्राप्त झालेल्या अर्जानुसार संबधित गोशाळेमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन परिशिष्ट ब प्रमाणे स्वाक्षरीसह आयुक्त पशुसंवर्धन यांना माहिती सादर करण्याचा अंतिम करण्याची अंतिम तारीख 20 जुलै आहे.

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त अलिबाग-रायगड यांच्याकडून प्राप्त झालेल्या अर्जांची प्राथमिक छाननी करून शासनास प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे, तरी इच्छुक पात्र संस्थेने आवश्यक ती कागदपत्रे, अर्ज परिशिष्ट अ व ब सहित 30 जून 2019 पर्यंत सादर करावीत. इच्छुक संस्थेने शासनाने निश्चित केलेले अर्ज तात्काळ जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय रायगड-अलिबाग येथून कार्यालयीन वेळेत येऊन प्राप्त करुन घ्यावेत. हे अर्जाचे नमुने जिल्ह्याच्या माहिती संकेतस्थळावरही उपलब्ध करण्यात आले आहेत. तरी इच्छुक संस्थांनी शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply